वारणानगर : येथील कोरे अभियांत्रिकी मध्ये मेकॅनिकल विभागात 'मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्ट असोसिएशन’च्या स्टुडंट्स चॅप्टर (विद्यार्थी शाखेचे) उदघाटन कोल्हापूर रोटरी क्लबचे सेक्रेटरी आणि शिंपुकडे ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. एस. शिंपुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
“यांत्रिक पदवीधरांकडून उद्योगाच्या अपेक्षा” या विषयावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी, उद्योगपतींच्या व्याख्यानांना आणि तांत्रिक स्पर्धांना उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मानवता, नैतिकता, अध्यात्म जीवनात अंगीकारण्याचे सुचवले. तुम्हाला चांगले अभियंता किंवा चांगले उद्योजक व्हायचे असेल तर चांगल्या सवयी जोपासा, तुमच्या शब्दाचा आदर करा, इतरांचे कौतुक करण्यात अजिबात संकोच करू नका, असे मार्गदर्शन हि त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया यशस्वीरित्या राबवून शंभर टक्के ऍडमिशन केलेबद्दल विभागाचे कौतुक केले. त्यांनी शिक्षण प्रणाली, कॉर्पोरेट जग, संवाद कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स विध्यार्थ्यांसाठी कसे महत्त्वाचे आहेत यावर प्रकाश टाकला.
प्रा. एस. एम. गिडवीर यांनी स्टुडंट्स चॅप्टरचे महत्व आणि त्यांचे उपक्रमांबद्दल माहिती दिली, चालू शैक्षणिक वर्षामध्ये स्टुडंट्स असोसिएशन कडून विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम, कार्यशाळा व प्रशिक्षण असे कार्यक्रम आयोजित केले जातील व याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक यांनी केले. अधिष्ठाता,डॉ.एस. एम. पिसे यांनी आयडिया लॅबच्या प्रस्तावाबद्दल माहिती सांगून असोसिएशनला शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. डी. एन. माने यांनी स्टुडंट्स असोसिएशन चे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी वारणा समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक प्रा. शिवानंद गिडवीर यांनी केले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.व्ही. व्ही. कारजिन्नी, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, , प्राचार्य डॉ. डी. एन. माने, , मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, शैक्षणिक समन्वयक प्रा. जी. एस. कांबळे, समन्वयक प्रा. एस. एम. गिडवीर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.