SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांची दिवाळी गोड; १६.६६% बोनस जाहीर!घोडावत विद्यापीठात ‘स्टार बिझ बझार २०२६’चे उद्घाटनभाजपा जिल्हा कार्यालयात नूतन आमदार कौस्तुभ गावडे यांचा भव्य सत्कारदक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवडआमदार सतेज पाटील यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तरकोल्हापूर दूध संघ निवडणुकीवरून मंत्री हसन मुश्रीफांचा संताप; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!'गोकुळ' : बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं!माणुसकीचा जिव्हाळा: आंतरराष्ट्रीय काळजी आणि समर्थन दिनइचलकरंजी: 'केन चेस सॉल्व्हिंग कप'मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा डंका; ६ बालचमूंनी मारली बाजीसमकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक

जाहिरात

 

घोडावत विद्यापीठात ‘स्टार बिझ बझार २०२६’चे उद्घाटन

schedule29 Oct 26 person by visibility 119 categoryशैक्षणिक

 विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ

कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या वतीने ‘स्टार बिझ बझार २०२६’ या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या कॅम्पस फूड कोर्ट येथे उत्साहात संपन्न झाले. ‘व्हेअर क्रिएटिव्हिटी मीट्स कॉमर्स’ अर्थात ‘जेथे सर्जनशीलता आणि वाणिज्य यांचा संगम होतो’ ही या उपक्रमाची संकल्पना आहे.

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, उद्योजकीय कौशल्ये, व्यावसायिक कल्पकता आणि व्यापारविषयक क्षमता यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या बझारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात साकारण्याची, उत्पादनांचे व सेवांचे सादरीकरण करण्याची तसेच ग्राहकांशी संवाद साधून व्यवसायाचे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या उपक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे समन्वयन करण्यात आले.

‘स्टार बिझ बझार’ हा केवळ विक्रीचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण देणारा एक महत्त्वपूर्ण मंच आहे. नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, विपणन, ग्राहकाभिमुखता, संवादकौशल्ये आणि संघभावना यांसारख्या व्यावसायिक गुणांचा विकास करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.

हा उपक्रम शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजीही सुरू राहणार असून, सायंकाळी ४ वाजता समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यावसायिक संधींची जोड देत त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला चालना देण्याच्या दृष्टीने ‘स्टार बिझ बझार २०२६’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes