SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

मतदान जागृती अभियान अंतर्गत के.एम.सी. कॉलेजचे पथनाट्य सादरीकरण

schedule08 Jan 26 person by visibility 386 categoryसामाजिक

कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मतदार जागृती अभियाना अंतर्गत महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी कलावंतांनी 'मतदार राजा जागा हो ' हे प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. यामध्ये मतदान करणे हे नागरिकाचा महत्वपूर्ण अधिकार आहे.

   सर्वांनी तो योग्यरित्या बजावलाच पाहिजे. लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान दिले पाहिजेल हा संदेश यातून जनतेला दिला. गंगावेश (के. एम. टी.) बसस्थानक आणि भवानी मंडप परिसरात सादर केलेल्या या पथनाट्यास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब उलपे, पर्यवेक्षक डॉ.अमित रेडेकर, अधीक्षक विनायक मेस्त्री, प्रा.पी.डी.तोरस्कर, प्रा.कुमुदिनी देसाई, प्रा.रवींद्र मांगले, डॉ.सचिन धुर्वे, डॉ.सयाजी गायकवाड, डॉ.किरण भोसले, डॉ.जोत्स्ना शिवणकर, डॉ.प्रशांत नागावकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes