कोल्हापुरात गौरी-गणपती विसर्जन: पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
schedule19 Sep 26 person by visibility 277 categoryसामाजिक
कोल्हापूर : गेले सहा दिवस घरोघरी भक्तिभावाने पूजा-अर्चा केलेल्या गणरायाला निरोप देण्यात आला. "पुढच्या वर्षी लवकर या" अशी साद घालत कोल्हापूरकरांनी यंदाही पर्यावरणपूरक पद्धतीने गौरी-गणपती विसर्जन केले. कोल्हापूर महापालिकेने संपूर्ण शहरात विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती. तसेच काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी गृहनिर्माण सोसायटी व कॉलनीत स्वतंत्र विसर्जन कुंडांची व्यवस्था केली, ज्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
दुपारपासून घरगुती गणपती विसर्जनाला वेग आला आणि रात्रीपर्यंत शहरात सुमारे ६० हजार गणेशमूर्ती कुंडांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यातून कोल्हापूरकरांनी नदी आणि तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावला.
मात्र, त्याचवेळी काही नागरिकांनी तलाव आणि नदीत गणेशमूर्ती विसर्जित केल्याचेही यावर्षी पाहायला मिळाले.