SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक: सोलापुरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा धडाका पोलिसांचा स्मृतिदिन: कर्तव्य, त्याग आणि शौर्याचा गौरव‘संविधानाच्या रक्षणासाठी मशाल धगधगत ठेवा’; शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागतविजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न..!NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध!कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू! महायुतीच्या कार्यकर्त्यांचा निर्धारहसूर येथील आरोग्य शिबिरात ३८३ नागरिकांची तपासणीपुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

जाहिरात

 

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक: सोलापुरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा धडाका

schedule21 Oct 26 person by visibility 140 categoryराजकीय

सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, सोलापूर जिल्ह्यात शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने जोरदार वेग घेतला आहे. पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरनंतर आता गावडे यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा पिंजून काढत प्रचाराचा झंझावात निर्माण केला असून पंढरपूरपासून माळशिरसपर्यंत विविध गाठीभेटी, संवाद आणि प्रचार सभांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी तीव्र केली आहे.

या प्रचारादरम्यान त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रणवजी परिचारक, सांगोल्यात माजी आमदार दीपक आबासाहेब साळुंखे, आमदार बाबासाहेब देशमुख, तसेच आमदार सुभाष बापू देशमुख आणि आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन त्यांनी पाठिंबा मिळवला आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णीत महायुतीच्या प्रचार बैठकीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

याशिवाय श्रीराम विद्यालय, आसावा दयानंद हायस्कूल, निवडूनटेश्वर हायस्कूल, बार्शीचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि माळशिरसमधील श्रीराम शिक्षण संस्था व मॉडेल विविधारांग शाळा व महाविद्यालयाला भेट देऊन त्यांनी संवाद साधला आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या पाठिंब्याची पुष्टी मिळाली असून रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व मतदारांशी संवाद साधला जात आहे. 

श्री १०८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद आणि ब्रह्म होटकी महाराज शैक्षणिक संकुलाकडूनही पाठिंबा मिळाला असून माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत महायुतीची प्रचार सभा उत्साहात पार पडली. नेत्यांच्या भेटी, विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा आणि जिल्हाभरात झालेला थेट संपर्क यामुळे सोलापूरच्या राजकीय मैदानात वाढलेली ही धावपळ शिक्षक मतदारांच्या कौलासाठी किती निर्णायक ठरणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes