SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जेव्हा पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा ...२ मार्चपासून सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होणारविशेष संख्याशास्त्रीय सादरीकरणात कवठेमहांकाळचे महाविद्यालय प्रथममुंबईचे महापौर, उपमहापौर, पदाधिकारी सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटनसाहित्य, समाज, वास्तवाशी जोडलेले चित्रपट हे प्रभावी माध्यम : डॉ. डेल्फिम द सिल्वा; शिवाजी विद्यापीठात ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटनभाजपा जिल्हा कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादनएस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजननोकरी शोधणारे नव्हे, रोजगारनिर्माते बना : सुरेश उमाप; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता जनजागृती कार्यक्रम

जाहिरात

 

विशेष संख्याशास्त्रीय सादरीकरणात कवठेमहांकाळचे महाविद्यालय प्रथम

schedule11 Feb 26 person by visibility 95 categoryराज्य

कोल्हापूर : दैनंदिन जीवनातील वास्तव समस्यांवर संख्याशास्त्र उपयुक्त ठरू शकते, याची प्रचिती देणाऱ्या विशेष प्रकल्प सादरीकरण स्पर्धेमध्ये कवठेमहांकाळच्या पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. 

शिवाजी विद्यापीठाचा संख्याशास्त्र अधिविभाग आणि शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वास्तव समस्यांचे सांख्यिकीय विश्लेषण’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेच्या निमित्ताने काल (दि. १०) संख्याशास्त्राच्या बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझ्या परिसरातील प्रति व्यक्ती मासिक वाहन इंधन वापराचा अंदाज’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत एकूण दहा महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. प्रथम फेरीतून एल. बी. एस. महाविद्यालय (सातारा), पी.डी.व्ही.पी. महाविद्यालय (तासगाव), पी.व्ही.पी. महाविद्यालय (कवठेमहांकाळ), विवेकानंद महाविद्यालय (कोल्हापूर) आणि एस.जी.एम. महाविद्यालय (कराड) यांचे संघ अंतिम फेरीसाठी पात्र झाले. या महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कार्यशाळेमध्ये त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांनी द्वितीय आणि सद्गुरू गाडगेबाबा महाराज महाविद्यालय, कराड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून डॉ. शशिभूषण महाडिक आणि गणेश खटावकर यांनी काम पाहिले.

या कार्यशाळेत ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे, डॉ. महाडिक आणि डॉ. सोमनाथ पवार यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

 कार्यशाळेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा, मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बी.एस्सी. तृतीय वर्ष सांख्यिकीचे विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले. डॉ. सुकुमार राजगुरू यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes