कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृतीचे स्टिकर्स देऊन दीपावलीच्या शुभेच्छा
schedule29 Oct 24 person by visibility 283 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सिस्टॅमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉन पार्टिसिपेशन स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात 274 दक्षिण व 276 उत्तर मतदारसंघ नोडल ऑफिसर तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यासाठी सब नोडल ऑफिसर तथा वरिष्ठ लेखापरीक्षक वर्षा परीट यांच्या नियंत्रणाखाली शहरातील वेगवेगळ्या आस्थापनाना, मॉल, मोठे बझार या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा म्हणून मतदान जनजागृतीचे स्टिकर्सद्वारे वाटप करण्यात आले. या योजनेमध्ये महानगरपालिकेतील परवाना, अतिक्रमण, घरफाळा विभाग व सर्व विभागीय कार्यालयांनी ही स्टिकर्स वाटप करण्यात सहभाग घेतला. यामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी मतदारांना " 20 नोव्हेंबरला मतदान करा लोकशाहीची दिवाळी साजरी करा " असा दीपावलीचा शुभ संदेश दिला.
या उपक्रमाअंतर्गत उपायुक्त पंडित पाटील यांनी विविध आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देवून मतदान करण्याबाबत आवाहन केले. शहरातील बाजार पेठेतील हमाल, ट्रॅफिक पोलिस यांनाही मतदान जनजागृती व दिपावली शुभेच्छा यावेळी दिल्या. तसेच महानगरपालिका आवारात मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनीही आपल्या गाडीवर स्टिकर लावून स्टाफ सोबत शपथ घेतली. यावेळी सर्व फायरच्या गाड्यांवरती दीपावलीच्या शुभेच्छांचे स्टिकर लावण्यात आले. शहरातील विविध आस्थापनांनी याची दखल घेऊन या उपक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
या उपक्रमामध्ये मतदार संघ 274 कोल्हापूर दक्षिण नोडल ऑफिसर तथा मुख्यलेखापाल संजय सरनाईक, मतदार संघ 276 कोल्हापूर उत्तर नोडल ऑफिसर नेहा अकोडे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, परवाना विभाग अधीक्षक अशोक यादव, अतिक्रमण विभाग प्रमुख विलास साळोखे व इतर अधिकारी यांनी सहभाग नोंदवला.