सहकार सप्ताह निमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण...
schedule14 Nov 24 person by visibility 135 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत ७१ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्हणण्यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १३५ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाली की, महाराष्ट्रातील सहकारी संस्थांमुळेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व दूध उत्पादकांचा विकास झाला आहे. यामध्ये गोकुळचे फार मोठे योगदान असून भविष्यात सहकार वाढविण्याच्या दुर्ष्टीने सर्वांनी प्रामणिक प्रयत्न करावे असे मनोगत व्यक्त केले व जिल्ह्यातील सर्व सहकारी दूध संस्था, दूध उत्पादक, अधिकारी व कर्मचारी यांना सहकार सप्ताह व बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ७१ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह साजरा केला जात असून या सप्ताहनिमित्त संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात मंगळवार दि. १९ नोव्हेंबर २०२४ दुपारी २.०० वाजता ‘महिला युवक व दुर्बलघटकांसाठी सहकारिता’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
यावेळी स्वागत प्रास्ताविक डॉ.एम.पी.पाटील यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार डॉ.प्रकाश साळुंखे यांनी मानले.
यावेळी संघाचे चेअरमन अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, बी.आर. पाटील, जगदीश पाटील, डॉ प्रकाश दळवी, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर संघाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.