+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule15 Jul 24 person by visibility 317 categoryगुन्हे
कोल्हापूर: विशाळगड (ता. शाहूवाडी) येथील किल्ल्यावर व गाजापूर आणि मुसलमानवाडीतील विशिष्ट समाजाच्या घरावर दगडफेक, हल्ले करून जाळपोळ केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांत सुमारे ६० जणांबर सोमवारी गुन्हे दाखल झाले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यातील २१ जणांना अटक केली. 

२१ जणांना अटक : 
कसबा बावडा परिसर : चेतन आनंदराव जाधव (३०, रा. ई- वॉर्ड, लाइन बझार, कसबा बावडा), ओंकार दादा साबळे (२१, रा. चौगले गल्ली), प्रेम पंडित पाटील (२१, रा. जयभवानी कॉलनी), रोहन पांडुरंग पाटील (२५, रा. गोळीबार मैदान), सूरज माणिक पाटील (२९, रा. चावडी गल्ली), सुशांत दिनकर उलपे (२६, रा. उलपे मळा), आदित्य अविनाश उलपे (२९, रा. उलपे गल्ली), दीपक तानाजी सोळवंडे (२६, रा. गोळीबार मैदान, नेजदार कॉलनी)

• इचलकरंजी : नितीन बाबूराव वर्षे (५१, रा. शिक्षक कॉलनी, आमराई रोड), प्रकाश गणपतराव मोरबाळे (४७, रा. प्लॉट क्रमांक ४, जिजामाता सोसायटी, जवाहरनगर), मधुकर बब्रुवानगुरव (४५, रा. गावभाग, महादेव मंदिराजवळ), सिद्धार्थ धोडींबा कटकधोंड (३०, रा. बी- वॉर्ड, खणभाग, जवाहरनगर), मधुसूदन प्रताप भोई (३५, रा. मुरदंडे मळा, गल्ली क्रमांक एक), योगेश चांगदेव पाटील (४३, रा. गणेशनगर)

• गोकुळ शिरगाव : ओकार तुकाराम चौगुले (२१), महेश आनंदा पाटील (२२) व सचिन विठ्ठल संकपाळ (४२, तिघेही, रा. गुरव गल्ली), गोपी कुंडलिक सूर्यवंशी (३०, रा. कागदेमाळ)

• करवीर : ओकार सुनीलसिंह राजपूत (२९, रा. जाधववाडी, मार्केट यार्ड, कोल्हापूर), सुशांत आत्माराम सरदेसाई (२८, रा. बालाजीनगर, कणेरीवाडी, ता. करवीर), योगेश चंद्रकांत भाट (३३, रा. टेंबलाईवाडी, उचगाव, ता. करवीर)

संशयितांविरुद्ध शाहूवाडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने बंदोबस्तावर असलेल्या अधिकाऱ्यांसह पोलिसांवर दगडफेक, धक्काबुक्की, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गृह अतिक्रमण करणे, स्फोटक पदार्थांद्वारे आगळीक करणे, धार्मिकस्थळाची नासधूसधार्मिक भावना भडकावणे, दुखावणे, स्फोटक पदार्थांद्वारे निष्काळजीपणाचे वर्तन, दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, बेकायदा जमाव करून शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकांवर हल्ला करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा विविध कलमान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा मला अटक करा या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलिस ठाण्यात चार तास ठाण मांडून होते. मात्र, उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. असे सांगितले.