+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule30 Mar 24 person by visibility 294 categoryआरोग्य
कोल्हापूर : एकात्मिक साथरोग सर्वेक्षण कार्यक्रमात माहे डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ निर्देशांकातील सादरीकरण व सर्वेक्षणात कोल्हापूर जिल्हा राज्यात कोल्हापूर अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

माहे डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ अखेर प्राप्त झालेल्या गुणानुक्रम अहवालात लक्षणावर आधारित (Syndromic) सर्वेक्षण, आजाराच्या गृहीतकांवर (Presumptive) आधारित सर्वेक्षण, प्रयोगशालीय (Lab Confirmed) सर्वेक्षण, साथरोग सर्वेक्षण (CASE Reporting), साथरोग उद्रेक प्रतिसाद (Outbreak Response) या सर्व निर्देशांकातील सादरीकरणात कोल्हापूर जिल्ह्याने जिल्हा महाराष्ट्र राज्यात अग्रेसर आहे.

तसेच, जिल्ह्यातील ७६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४१४ उपकेंद्र, १५ ग्रामीण रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालय व १ जिल्हा सामान्य रुग्णालयातील एकात्मिक साथरोग सर्वेक्षण कार्यक्रमात येथील विविध संसर्गजन्य आजारांची माहिती राज्यपातळीवर आणि केंद्रस्तरावर दैनंदिन व मासिक स्वरुपात सर्वेक्षण, साथ नियंत्रण अहवाल सादरीकरण होते. या आजारात डेंगू, हिवताप, चिकुनगुनिया, झिका, कावीळ, अतिसार, कॉलरा, कोविड १९, स्वाईन फ्लू, रेबीज आदी आजारांचा समावेश आहे.