+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule19 Oct 24 person by visibility 245 categoryशैक्षणिक
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालयातील केमीकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक प्रशांत भैयासाहेब देहनकर यांना विसवेश्वराय टेकनॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी (रिसर्च सेंटर: एस डी यम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, धारवाड) कडून पी.एच.डी. पदवी प्रदान झाली आहे. 

प्रा. देहनकर हे केमीकल इंजिनिअरिंग विभागात अनुभवी प्राध्यापक असून, त्यांनी "स्टडीज ऑन हीट ट्रान्सफर कॅरॅक्टरिस्टिक्स बाय इन्सर्टींग ट्विस्टेड टेप इन हीट एक्सचेंजर" या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी त्यांना प्राध्यापक डॉ. केशव जोशी आणि डॉ. यु. बी. देशांनवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला डॉ. विनय कोरे यांनी दिला. 

अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने व विभागप्रमुख डॉ. के. आय. पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि विभागातील सर्व वरिष्ठ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.