SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्पकेडीसीसी बँकेला लावलेला दंड उत्स्फूर्तपणे भरला शेतकऱ्यांनीचसंसदेवरील मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवणारा RAF जवान निष्पन्न; CRPF च्या चौकशीत ७ राऊंड फायर केल्याची धक्कादायक माहिती उघड!दुथडी भरून वाहतीये पंचगंगा अन् कोल्हापूरकर मात्र कोरड्या घशाने त्रस्त! साता समुद्रापारही दुमदुमला 'विठ्ठल विठ्ठल'चा गजर; जर्मनीतील आषाढी वारीने जपली महाराष्ट्राची भक्तीपरंपराशौर्य, सेवा आणि निष्ठा: केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) स्थापना दिवस आणि देशाच्या सुरक्षेचा अभेद्य बुरूजसुवर्णझेप! मीराबाई चानूचा इतिहास; ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक!घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनपैशांअभावी शस्त्रक्रिया थांबणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडीकेटीईच्या २९ विद्यार्थींनींची कॅपजेमिनी या नामांकीत कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवरती निवड

जाहिरात

 

गडहिंग्लज नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारार्थ आमदार डॉ.विनय कोरे यांनी मतदारांशी साधला संवाद

schedule30 Nov 25 person by visibility 377 categoryराजकीय

कोल्हापूर  : गडहिंग्लज येथे गडहिंग्लज नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारार्थ कोपरा सभा व विविध प्रभागांमधील मतदारांच्या आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी गाठीभेटी घेतल्या तसेच मतदारांशी संवाद साधला.

गडहिंग्लज नगरपरिषद निवडणूक २०२५ जनता दल - भाजपा - शिवसेना (शिंदे गट) व जनसुराज्य शक्ती या महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री.गंगाधर राजशेखर हिरेमठ यांच्यासह २२ नगरसेवक पदाच्या उमेदवारांना येत्या २ डिसेंबर रोजी प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले.

 गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जनता दल - भाजपा - शिवसेना (शिंदे गट) व जनसुराज्य शक्ती या महायुतीने उमेदवारी बहाल केली आहे. सत्ता साध्य नव्हे तर सेवेचे साधन म्हणून राबवत ही महायुती काम करेल, त्यामुळे गडहिंग्लज शहराच्या उज्वल भवितव्याचा विचार करून जनता दल - भाजपा - शिवसेना (शिंदे गट) व जनसुराज्य शक्ती या उमेदवारांना "डोक्यावर भारा घेतलेली स्त्री - कमळ - धनुष्यबाण आणि नारळाची बाग" या चिन्हा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करत सेवेची संधी द्यावी असे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले.

यावेळी जनता दल - भाजपा - शिवसेना (शिंदे गट) व जनसुराज्य शक्ती या महायुतीचे सर्व उमेदवार,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes