SMP News Network
एकच लक्ष्य .. सदैव दक्ष ..
Register
Breaking : bolt
कोल्हापूर विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रकाशनकोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार : बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागरसहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण...एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करारकोल्हापूर जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश जारीमहिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाडआ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराजउदारमतवादी, लोकशाहीवादी पहिले पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरूतावडे हॉटेल नजीक घडलेल्या फसवणूकीतील 25.53 लाख रु. घेवून जाणाऱ्या एकाविरुद्ध गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

महाअप्सरा माधुरी पवार थिरकणार 'या बया दाजी आलं' या इर्सल चित्रपटातील लावणीवर

schedule07 May 22 person by visibility 270 categoryमनोरंजन

कोल्हापूर : आपल्या लावणी अदाकारीसाठी प्रसिद्ध असलेली महाराष्ट्राची महाअप्सरा आणि सातारची गुलछडी, अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार 'या बया दाजी आलं' या लावणीवर थिरकताना आणि आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला पुन्हा वेड लावण्यासाठी सज्ज झाली आहे. 'अप्सरा आली' नंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांना माधुरी पवारची ही नखरेल अदाकारी भलरी प्रॉडक्शन्सनिर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत आगामी बहुचर्चित ''इर्सल' चित्रपटात बघायला मिळणार आहे. 'राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!' टॅगलाईन असलेल्या 'इर्सल' चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे.

'इर्सल' चित्रपटाला 'नाद करायचा नाय' फेम संगीतकार दिनकर शिर्के यांचे संगीत असून, 'या बया दाजी आलं' हे बहारदार गीत त्यांनीचं लिहिले आहे.  

या गाण्याबद्दल गीत, संगीतकार दिनकर शिर्के म्हणाले, 'या बया दाजी' ही लावणी मला एका प्रवासादरम्यान सुचली, एका टमटमच्या मागे हे वाक्य लिहिलेलं होतं, एका छोट्या मुलीने ते वाचलं आणि सारखं गुणगुणतं होती त्यातून ही लावणी घडली. ऊर्मिला धनगर यांनी आपल्या खास शैलीत स्वरबद्ध केली असून नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आणि एक्स्प्रेशन क्वीन माधुरी पवारने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. चित्रपटात आणखी चार गाणी असून प्रत्येकाचा बाज वेगळ्या धाटणीचा असल्याने 'इर्सल'ची गाणी प्रेक्षकांना भावतील, असा विश्वास आहे.

दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार म्हणाले, आतापर्यंत राजकारणावर अनेक चित्रपट, नाटके आली. बर्‍याचदा त्यातील मांडणी खूप वरच्या स्तरातील असते. 'इर्सल' हा सिनेमा एकदम खालच्या फळीतील राजकारण आणि त्यातून प्रत्यक्ष घडणार्‍या घटनांमागील घटनांचा पर्दाफाश करतो. प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार जाणूनबुजून किंवा अप्रत्यक्ष या षडयंत्रात कसा गोवला जातो? ते इर्सलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, हेच या सिनेमाचं वेगळेपण आहे.

'इर्सल'चे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत. 'इर्सल' चित्रपटातून विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे-पाटील ही फ्रेश जोडी पदार्पण करत आहे. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, अभिनेत्री माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, सुधीर फडतरे, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, वैशाली घोरपडे, चैताली-बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत.

कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची तर संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. बहुचर्चित 'इर्सल' येत्या ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes