SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणकळंबा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर प्रकाश खडके यांच्या हस्ते ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेत ध्वजारोहण उत्साहात कामगार दिन : श्रमिकांच्या घामाचा आणि संघर्षाचा सन्मानमहाराष्ट्र दिन : मराठी अस्मितेचा सुवर्ण सोहळास्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठावटाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणीराष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवडडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशनगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा; अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण; श्री. महादेव दूध संस्थेची याचिका फेटाळली

जाहिरात

 

कळंबा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर प्रकाश खडके यांच्या हस्ते ध्वजारोहण

schedule01 May 26 person by visibility 115 categoryसामाजिक

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील कळंबा तर्फ ठाणे ग्रामपंचायत येथे आज, शुक्रवारी अत्यंत उत्साही आणि मांगल्याच्या वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ग्रामपंचायत इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडले.

​या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने झाली. सुरुवातीला लोकनियुक्त सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत क्लार्क प्रकाश रघुनाथ खडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून भारतमाता आणि महाराष्ट्राचा जयजयकार केला.

​या दिमाखदार सोहळ्याला लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये उपसरपंच रोहित मिरजे, सदस्य विकास पवार, दीपक तिवले, संदीप पाटील, रोहित जगताप, स्वरुप पाटील, उदय जाधव, सोनल शिंदे, पुनम जाधव, दिपाली रोपळकर, मीना गोंड, वैशाली टिपूगडे, आशा टिपूगडे, स्नेहल जाधव, भाग्यश्री पाटोळे, संगीता माने, छाया भवड आणि माजी सरपंच विश्वास गुरव यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
​प्रशासकीय स्तरावरून ग्रामपंचायत अधिकारी व्ही. डी. राबाडे, महसूल तलाठी सचिन पाटील, भूमी अधिकारी दीपक कोरडे, कृषी अधिकारी नामदेव गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

तसेच  लक्ष्मण मिरजे, महादेव तिवले, विशाल सोनुले, अमोल पाटील, निवृत्ती चौगुले, राहुल मिरजे, प्रथमेश तिवले, अनिल अवघडे, बजरंग टिपूगडे, सुरेश लोहार, अमर मांगलेकर, वसंत तिवले, प्रवीण जाधव, जयश्री तिवले, राजू गोंड, अतुल अवघडे, दिलीप साठे, महेश अवघडे, विद्या माने, गीता माने, विमल तडाखे आणि शांताबाई सोनुले यांसह कळंबा गर्ल हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes