पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशामध्ये राज्य सरकार विकत घेण्याची नवीन परंपरा; संविधान विरोधी कृती; प्रियंका गांधी यांची टीका; कोल्हापुरातील गांधी मैदानात महाराष्ट्र स्वाभिमान सभेस उस्फुर्त प्रतिसाद
schedule16 Nov 24 person by visibility 398 categoryराजकीय
कोल्हापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेसचे नेते राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते. मात्र प्रत्यक्षात जवाहरलाल नेहरू यांनी आरक्षण सुरू केले. राहुल गांधी यांनी चार हजार किलोमीटर कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली. मनिपुर ते मुंबई न्याययात्रा काढली, जातनिहाय जनगणनेसाठी ते मागणी करत आहेत. 50% आरक्षणातील अट शिथिल करण्याची मागणी करत आहेत. हे जनतेला माहित आहे.
मात्र आज भाजप भ्रष्टाचाराने सरकार चोरण्याचे काम करत आहे. भाजपने महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने आमदारांना विकत घेण्याचे काम केले. मात्र संविधान म्हणते की जनता सरकार निवडून देते. संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे . पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन परंपरा सुरू केली आहे. की देशामध्ये सरकार विकत घेतली जाऊ शकते. पक्ष फोडून सरकार बनवले जाऊ शकते. आणि हे लोक आम्हाला आरक्षण विरोधी समजतात. अशी जोरदार टीका अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली .
कोल्हापुरातील गांधी मैदान येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत त्या बोलत होत्या.
निवडणुकीच्या काळामध्ये विरोधक बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी बोलत आहेत पण त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीत सुरा खोपसण्याचे काम या लोकांनी केले. देशात गेल्या दहा वर्षापासून मोदींचे सरकार आहे .तर राज्यांमध्ये अडीच वर्ष महायुतीचे सरकार आहे. पण शेतकऱ्यांना या सरकारकडून काही मोठा लाभ झालेला नाही. निवडणूक समोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र महागाईला मोठ्या प्रमाणात जनता तोंड देत आहे. आरोग्य, शिक्षण सुविधा मिळण्यास खूप संघर्ष करावा लागत आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या विरोधकांना असे वाटते की
जातीच्या , धर्माच्या नावाखाली त्यांना भडकवून विजयी होऊ शकतील त्यामुळे काम करण्याची काय गरज नाही. पंतप्रधान मोदी तर सोडा त्यांचे नेते तुमच्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे तुमचा संघर्ष त्यांना कसा कळणार. दूध उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी संकटात आहेत. त्यांना योग्य मोबदला मिळत नाही प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते त्यावर मोठा टॅक्स आहे. शेतकरी हा संघर्ष करत आहे त्याला सरकारकडून कोणती मदत मिळत नाही मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत.
महाराष्ट्रामध्ये युवकांना रोजगार मिळत नाहीत महाराष्ट्रात येणाऱ्या मोठ्या कंपन्या गुजरातकडे जात आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करण्याची गोष्ट होत नाही. परंतु मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात आहे. मात्र महाविकास आघाडी तर्फे सत्तेत आल्यानंतर पाच गॅरंटी देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेट मीटिंग पासूनच केली जाईल असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले ही निवडणूक सध्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असून महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. या महाराष्ट्राच्या एकात्मतेसाठी आताची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आज महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मला सलाम करायचा आहे खरे निष्ठावंत तुम्ही आहात महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे राजकारण झालं परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असुदे या तिन्ही पक्षाचे निष्ठावान म्हणून आपण येथे उपस्थित आहात. कोल्हापूरमध्ये माता भगिनींचा सन्मान न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ 20 तारखेला येणार आहे. मला आशा आहे की जनता कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम बनवायचा असेल तर महाराष्ट्राच्या नकाशावरती कोल्हापूर जिल्हा झळकायचा असेल. तर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
खासदार शाहू महाराज म्हणाले की, लोकसभेमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाहीत. आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यांमध्ये पूर्ण बहुमत मिळेल. महाविकास आघाडीचे सरकार येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले
सभेत ऑलम्पिक वीर पैलवान बजरंग पुनीया खासदार विश्वजीत कदम, चंद्रकांत यादव, संदीप देसाई, शरदचंद्र कांबळे, दगडू भास्कर, भारती पवार, अतुल दिघे, शिवाजी परुळेकर, आमदारअंजली हेंबाळकर, राजेश लाटकर, राहुल पाटील, राजू आवळे, ऋतुराज पाटील, के. पी. पाटील, आर. के. पवार, विजय देवणे, संजय पवार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.