SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरात इंडिया आघाडीची बैठक कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती : जनजागृतीसह कारवाईचे निर्देशदूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध : चेअरमन, नविद मुश्रीफगोकुळच्‍या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांची निवड...'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप; गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुलेजागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात; कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेशी सामंजस्य करारकोल्हापूर जिल्ह्यात 12 जून पर्यंत मनाई आदेश जारी शिवसेना मदत कक्ष कोल्हापूरतर्फे आरोग्य दूत राजेंद्र मकोटे यांचा सत्कारसेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाबाबत आवश्यक जागेचा प्रस्ताव आठ दिवसांत कोल्हापूर महापालिकेकडे द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरडीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागतील १६० विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर्स

जाहिरात

शहीद जवान सुनिल गुजर यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

schedule17 Mar 25 person by visibility 503 categoryराज्य

कोल्हापूर :  शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील भूमिपुत्र, कै. सुनिल गुजर (११० इंजिनियर रेजिमेंट, अरुणाचल प्रदेश) हे देशसेवेच्या कर्तव्यावर असताना दिनांक १३ मार्च रोजी शहीद झाले. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवरील काम सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांनी प्राण गमावले. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात झालेल्या या अंत्यविधीसाठी कुटुंबीय, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 सुनिल गुजर यांच्या सेवा आणि त्यागाला संपूर्ण गावाने अभिमानपूर्वक सलाम केला. त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली असून, कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण जिल्हा सहभागी झाला आहे.

देशासाठी सेवा देणाऱ्या या वीरपुत्राच्या स्मृतींना कोल्हापूरकर कायम अभिवादन करतील. जवान सुनिल विठ्ठल गुजर (२५) अरूणाचल प्रदेशात चीन सीमेलगत रस्ता बनविण्याचे काम करत असताना, दि.१३ मार्च रोजी त्यांचे वाहन खोल दरीत कोसळले होते. या अपघातात त्यांना वीरमरण आले. या बातमीने संपुर्ण शाहुवाडी तालुक्यावर शोककळा पसरली. काल सायंकाळी पुण्यातुन आज सकाळी कोल्हापूरात त्यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर लष्करी वाहनातून, त्यांच्या मुळ गावी दाखल झाले.

यावेळी बांबवडे बाजारपेठेसह परिसरातील गावांत बंद ठेऊन आदरांजली वाहली. जवान गुजर यांच्या अत्यंदर्शनासाठी बांबवडे पासुन त्यांच्या गावापर्यंत दोन्ही बाजुनी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस प्रशासन,सैन्य दलाच्या वतीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. वडिल विठ्ठल यांनी भडाग्नी दिला. यावेळी वीर जवान सुनील गुजर अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्यासह विविध संघटनांच्या वतीनेही श्रद्धांजली वाहण्यात आली.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes