SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कचऱ्यात सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज : हिमांशू लेलेकोल्हापूर : इराणी खण येथे 60,352 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती घ्या; योजनांचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला चालना द्या : पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दीपाली भुतकरसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : अध्यक्ष नवीद मुश्रीफआंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा दिन: महत्त्व आणि उद्दिष्टकोल्हापुरात गौरी-गणपती विसर्जन: पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसादराज्यपाल निवासस्थानातील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणारजम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

उत्सव काळात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ७ जणांचा मृत्यू

schedule31 Aug 25 person by visibility 697 categoryदेश

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौत एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. स्फोटातील जखमींना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान फटाक्यांचा कारखाना बेकायदेशीर असल्याची माहिती मिळत आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुर्सी रोडवरील गुंडबा येथील बेहटा गावात ही भीषण स्फोटाची घटना घडली. स्फोटानंतर घटनास्थळी पोहोचून बचाव पथकांनी बचाव कार्य सुरु केले. अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना घटनेची माहिती दिली आहे.  दरम्यान या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा वृत्तवाहिन्यांनी केला आहे. तर काहींनी २ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फटाक्यात जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांच्या उपचाराची योग्य ती व्यवस्था करण्याचेही आदेश दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes