SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरूकळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी मीना गौड यांची बिनविरोध निवडजगातील पहिली प्रवासी विमानसेवा: लंडन ते पॅरिससरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची माहितीपाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार : आमदार सतेज पाटीलसीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग स्पर्धेचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजनपंढरपुरातील भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल : आमदार यड्रावकरकोल्हापूर शहराचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य : आ. राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

कळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी मीना गौड यांची बिनविरोध निवड

schedule25 Aug 26 person by visibility 159 categoryराजकीय

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी मीना धर्मेंद्र गौड  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच रोहित संजय जगताप यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाल्या पदावर मीना गौड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून जल्लोष व्यक्त केला. ग्रामपंचायतीवर आमदार सतेज पाटील गटाची सत्ता आहे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सुमन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय अधिकारी विलास राबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. मीना गौड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, माजी उपसरपंच  रोहित जगताप, पूनम जाधव, संदीप पाटील, दीपक तिवले, छाया भवड, भाग्यश्री पाटोळे, रोहित मिरजे, विकास पवार- बावडेकर, संदीप पाटील, स्नेहल जाधव,  नितीश शिंदे, स्वरूप पाटील, वैशाली टिपुगडे, आशा टिपुगडे, संगीता माने, तसेच माजी सरपंच विश्वास गुरव, योगेश रोपळकर ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश खडके लक्ष्मण मिरजे महादेव तिवले अमोल पाटील विशाल सोनवणे निवृत्ती चौगुले ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes