+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule28 Jun 24 person by visibility 310 categoryउद्योग
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सह. साखर कारखान्यावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाची अन्यायी कारवाई मागे घ्यावी याबाबत करवीर तालुक्यातील कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी करवीर तहसीलदार यांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सह. साखर कारखाना लि. बिद्री (मौनीनगर) हा साखर कारखाना सहकारी क्षेत्रातील महाराष्ट्रासह सबंध देशातीलच एक आदर्श आणि गुणवत्त साखर कारखाना आहे. बिद्री साखर कारखाना म्हणजे ६५ हजार शेतकरी सभासदांच्या मालकीची मातृसंस्था आहे. किंबहुना सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती आणि सामाजिक उध्दाराचे हे श्रममंदीर आहे.

 दरम्यान शुक्रवार दि. २१ जून २०२४ रोजी आमच्या मातृसंस्थेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज डिपार्टमेंट) रात्री १०.३० वा. अचानक तपासणी सुरु केली. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार दि. २२ जून २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंत हि चौकशी सुरु होती. त्यानंतर सोमवार दि. २४ जून २०२४ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिस्टलरी प्रकल्पाचा उत्पादन व विक्री हे दोन्हीही परवाने निलंबित केले आहेत.

 परिणामी कारखाना डिस्टिलरीकडे उपलब्ध असलेल्या रेक्टिफाईड स्पिरीटची विक्री थांबली आहे. या सगळ्यातून बिद्री कारखाना मोडून शेतकऱ्याला देशाधडीला लावण्याचा हा कुटील डाव आहे. विरोधी मंडळींचे हे कारस्थान आम्ही सर्वच सभासद कदापिही सहन करणार नाही. हे कट-कारस्थान रचणाऱ्याच्या विरोधात आम्ही सर्व शेतकरी सभासद शड्डू ठोकून उभे आहोत. कारखाना मोडण्याचे त्यांचे सगळे मनसूबे आम्ही धूळीस मिळवू. अशी शपथ आम्ही या क्षणी घेत आहोत.

आमच्या या भावना आपल्या माध्यमातून शासनास कळवाव्यात, आणि आमच्या कारखान्यावरील अन्यायी कारवाई तातडीने मागे घेवून आम्हा समस्थ शेतकरी सभासदांना न्याय मिळावा, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. असे निवेदनामध्ये म्हटले आहे.

यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी करवीर तालुक्यातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तत्पूर्वी येथे झालेल्या सभेत सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करत ही कारवाई मागे घेण्याबाबत आवाहन केले.