+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule03 Jul 24 person by visibility 300 categoryउद्योग
इचलकरंजी : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या प्रामुख्याने ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधीत संशोधन व मार्गदर्शन करणा-या नामवंत संस्थेने 2 ते 5 जुलै या कालावधीत आयोजीत केलेल्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबीराकरिता कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे 34 ऊस उत्पादक सभासद शेतकरी रवाना झाले.

शेतकर्‍यांची ऊस शेती किफायतशीर होवून उत्पादनात वाढ व्हावी व त्यामधील सातत्य टिकवण्याच्या दृष्टीने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने विविध ऊस विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शेतीची सुधारीत पध्दत व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाची सखोल माहिती कारखान्याच्या सभासद शेतकर्‍यांना व्हावी यासाठी कार्यक्षेत्रामध्ये वेळोवेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आणि कारखान्याच्या शेती तज्ञांकडून मार्गदर्शनासाठी परिसंवादाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत हे सभासद शिबीरासाठी पाठवण्यात आले आहेत.

या प्रशिक्षणार्थी सभासद शेतकरी यांना ज्येष्ठ संचालक आण्णासो गोटखिंडे यांनी मार्गदर्शन करून आधुनिक ऊस, शेती प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी सभासद, संचालक सुरज बेडगे, जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे, उप मुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे व मुख्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.