+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule18 Oct 24 person by visibility 286 categoryशैक्षणिक
वारणानगर : वारणा विद्यापीठ व टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये यांच्यामध्ये मलेशियामध्ये सामंजस्य करार झाला. या करारावर वारणा विद्यापीठाकडून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास व्ही.कारजिन्नी,वारणा विद्यापीठाचे रिसर्च इनोवेशन अँड पार्टनरशिप चे डायरेक्टर, डॉ. उमेश देशन्नवार व टेलर्स युनिव्हर्सिटी कडून टेलर युनिव्हर्सिटीचे कार्यकारी प्राध्यापक डॉ. डेव्हिड असिर्वथम व अभियांत्रिकी प्रमुख,प्राध्यापक डॉ. सिम यी वाई, यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी प्रोफेसर डॉ. सायन रे, हेड स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स, फॅकल्टी ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी, डॉ. प्रवीना उपस्थित होते. 

वारणा विद्यापीठामधून डॉ. विलास व्ही. कारजिन्नी व डॉ. उमेश देशन्नवार खास करून सामंजस्य करण्यासाठी मलेशियात उपस्थित होते. या कराराच्या यशस्वीतेबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

या सामंजस्य करारामुळे वारणा विद्यापीठ व टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये संशोधन सहयोग,विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण, शैक्षणिक देवाणघेवाण (चर्चा, मंच, व्याख्याने इ.), पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संयुक्त पर्यवेक्षण, इतर कोणतेही शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील.टेलर्स युनिव्हर्सिटी, मलेशिया आणि आग्नेय आशियातील सर्वोच्च खाजगी विद्यापीठात व जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी 5 स्टार रेट केलेल्या काही आशियाई विद्यापीठांपैकी एक असुन विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षण उपलब्ध करून देतो. तर वारणा विद्यापीठ महाराष्ट्राच्या नवीन धोरणानुसार मान्यता मिळालेले राज्यातील पहिले राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठ आहे.