मुंबईतील फुटबॉलपटूंना सुवर्णसंधी!
schedule25 Oct 25 person by visibility 149 categoryक्रीडा
महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना; लिओनेल मेस्सी सोबत खेळण्याची संधी
मुंबई : महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), सिडको (CIDCO) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार क्रीडा विभागामार्फत, राज्यभरात “महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील फुटबॉल खेळाचा विकास, प्रसार व लोकप्रियता वाढविणे हा आहे. ही योजना १३ वर्षांखालील मुलं व मुली यांच्यासाठी असून अर्जदारांची जन्मतारीख ०१ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान असणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचण्या आयोजित केल्या जाणार आहेत. या निवड चाचण्यांच्या माध्यमातून राज्यातील ३० मुलं आणि ३० मुलींची अंतिम निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत जागतिक ख्यातीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची अविस्मरणीय संधी मिळणार आहे.
मुंबई जिल्ह्यासाठीची निवड चाचणी नवल डी’सूझा फुटबॉल ग्राउंड, वांद्रे (मुंबई) येथे होणार असून, केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच या निवड चाचणीसाठी माहिती व पुढील मार्गदर्शन मिळेल.
नोंदणीसाठी खालील लिंक सक्रिय करण्यात आली आहे.
https://forms.gle/6PAR766JoC9d2QH26
फुटबॉल खेळात उच्च कौशल्य असलेले आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडुंनीच नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.