SMP News Network
एकच लक्ष्य .. सदैव दक्ष ..
Register
Breaking : bolt
कोल्हापूर विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रकाशनकोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार : बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागरसहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण...एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करारकोल्हापूर जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश जारीमहिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाडआ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराजउदारमतवादी, लोकशाहीवादी पहिले पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरूतावडे हॉटेल नजीक घडलेल्या फसवणूकीतील 25.53 लाख रु. घेवून जाणाऱ्या एकाविरुद्ध गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

जस्टिन बीबरचा लवकरच नवी दिल्लीत म्युझिक कॉन्सर्ट; ४ जूनपासून अॅडव्हान्स बुकिंग

schedule24 May 22 person by visibility 232 categoryमनोरंजन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबरला त्याच्या उत्कृष्ट गाण्यांसाठी ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार हा स्टार गायक या वर्षी ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीत येणार आहे. बिबर भारतात येणार असल्याची माहिती Bookmyshow आणि AEG Presents ने मंगळवारी दिली.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, जस्टिन वर्ल्ड टूरचा एक भाग म्हणून कॅनेडियन गायक जस्टिन बीबर १८ ऑक्टोबरला नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये परफॉर्म करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टूरमध्ये स्टार गायक बीबर मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत आणखी ३० देशांचा दौरा करणार आहे आणि यादरम्यान तो १२५ हून अधिक शोमध्ये परफॉर्म करणार आहे.

या देशांमध्येही जाणार :
या दौऱ्यात बिबर ब्रिटन, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही जाणार आहे.

४ जूनपासून अॅडव्हान्स बुकिंग : या शोची अॅडव्हान्स बुकिंग ४ जूनपासून BookMyShow वर सुरू होईल. तिकटीची किंमत अंदाजे ४००० रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

पाच वर्षांनी होणार भारतात आगमन : जस्टिन बीबर भारतात येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, त्याने २०१७ मध्ये वर्ल्ड टूरचा एक भाग म्हणून मुंबईत परफॉर्म केला होता. म्युझिक कॉन्सर्टनंतर त्याला आग्राच्या ताजमहाल आणि राजस्थानला जायचे होते, पण संगीत कॉन्सर्ट करून भारतातून निघून गेल्याने त्याचा चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर निषेध केला.
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes