+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule25 Jul 24 person by visibility 515 categoryराज्य
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. 2, कोल्हापुर या विभागाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी (कोल्हापूर-बालींगे-कळे- साळवन - ते गगनबावडा) या रस्त्याच्या किमी 79/500 (बालींगे -भोगावती नदी) येथील अस्तित्वातील जुन्या दगडी कमानी पुला खालून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळी पर्यंत पोहोचली आहे.

 पुढील काही दिवसांच्या हवामान खात्याच्या अंदाजवरुन जिल्ह्यात पाणी-पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे, या परिस्थीतीचा विचार करुन रस्ते वाहतुक सुरक्षित ठेवणे व पुढील वित्त व जिवित हानी थांबविण्यासाठी बालींगे येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.2 चे उपअभियंता आर.बी.शिंदे यांनी दिली आहे.

पुराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपासून खाली पोहोचेपर्यंत या पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा उदा. रुग्णवाहिका, दुधाच्या गाड्या, भाजीपाला वाहतुक सुरु राहील. स्थानिक नागरिक व या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.