SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात अतिक्रमणावर कारवाईसर्वेश पोतदार बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्ययेणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटनमहाराष्ट्र व पंजाब राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशनमाजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हॉटेल असोसिएशनसोबत कार्यशाळाकोल्हापूर महापालिकेच्यावतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई‘गोकुळ’चे २५ लाख लिटर दूध संकलन सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार : नामदार हसन मुश्रीफनगरपालिका निवडणुकीसाठी शाहू छत्रपती, सतेज पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारकगांधीनगर पोलीस ठाणे हद्दीतील पंचगंगा नदीपुल येथे तलवारी घेऊन फिरणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू

जाहिरात

 

नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित, गाण्यातून दिला सामाजिक संदेश

schedule25 Sep 25 person by visibility 226 categoryमनोरंजन

▪️दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा

कोल्हापूर  : अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि सबसे कातिल गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. संगीत क्षेत्रात गोंधळावर रॅप करण्याचा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे. नवरात्रोत्सवा निमित्त जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित “अंबाबाई” गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे. करण गायकवाड, नेहा पोसरेकर, योगिता माने, संतोष पाखरे आणि विकी वाघ यांनी या गाण्यात प्रमुख भुमिका साकारली आहे. विकी वाघ याने हे गाण लिहीलं असून या गाण्याची गीतरचना, संगीत आणि दिग्दर्शन ही केले आहे. या गाण्याचे कोरिओग्राफर राहुल पांडे आहेत. तसेच डीओपी जॅक्सन कॅली हे आहेत. या गाण्याचे संगीत संयोजन स्मीत सोनटक्के आणि रिदम प्रोग्रामिंग अमोल नाईक यांनी केली आहे. या गाण्याची प्रसिद्धी विनया सावंत आणि फॉरेवर पीआर या कंपनीने केली आहे. “अंबाबाई” गाण्याची निर्मिती जेएसबी प्रोडक्शन यांनी केली आहे. हे गाणं कोल्हापूर येथे चित्रीत करण्यात आले आहे. 

दिग्दर्शक विकी वाघ गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो, “मला खूप दिवसांपासून एखाद एनर्जेटिक गाणं करायचं होत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मी “अंबाबाई” गाणं लिहायला घेतलं आणि ते करताना गाण्याचं कंपोझिशनही मला सुचलं. मग या गाण्याला जसा आवाज हवा होता त्यासाठी आम्ही बरेच प्रयोग केले आणि शेवटी मी गाण रेकॉर्ड करायचं ठरवलं. मला अंबाबाईच्या त्या भक्तांबद्दल बोलायचं आहे ज्यांना आपण कायम दुर्लशीत करतो किंवा त्यांना आपण योग्य ती वागणूक देत नाही. किन्नर, संबळ वादक, वासुदेव, लावणी कलावंत, गोंधळी, जोगवा मागणाऱ्या जोगतीण या महाराष्ट्रातील पिढ्यान पिढ्या आपला वारसा व संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतांना मी “अंबाबाई” गाण्यामार्फत आदरांजली अर्पण करतो.”

पुढे तो गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो, “अंबाबाई गाण संपूर्ण टीमने न झोपता सलग २४ तास शूट केल कारण अंबाबाई गाण्याच्या एनर्जीने आम्हाला ती ताकद दिली. या गाण्यातून प्रेक्षकांना “सगळ्यांचा आदर करा” हा संदेश मिळतो. प्रेक्षकांचा गाण्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता. हे गाणं आणि या गाण्यामार्फत समाजाप्रतीचा संदेश प्रेक्षकांना आपलस करेल यात शंका नाही. माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी माझ्या इतर गाण्यांप्रमाणे “अंबाबाई” गाण्याला खूप प्रेम द्या.”

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes