SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
10 वी पुरवणी परीक्षा जून-जुलैसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरूपश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीरविधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना दिली शपथअद्वितीय पराक्रमाचा जळजळता इतिहास: छत्रपती संभाजी महाराजपंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6 लाख 49 हजार जमाएमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्दमुश्रीफांचे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आवाहन: कर्जमाफीची वाट न पाहता मुदतीत कर्ज फेडा!छत्रपती शंभूराजेंच्या भव्य शिल्पामुळे शिरोळच्या इतिहासाला मिळाला उजाळा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरखुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू करा : मंत्री प्रकाश आबिटकरमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

जाहिरात

 

10 वी पुरवणी परीक्षा जून-जुलैसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

schedule14 May 26 person by visibility 156 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) मार्च परीक्षेचा निकाल 8 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जून-जुलै मध्ये घेण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी (फेबु. मार्च  परीक्षेस प्रविष्ट न झालेले) व जून-जुलै परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. 

परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने इयत्ता 10 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत -

विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा- 12 ते 21 मे पर्यंत, विलंब शुल्क- 22 ते 25 मे पर्यंत, माध्यमिक शाळांनी RTGS /NEFT व्दारे रक्कम भरावयाची तारीख- 26 मे पर्यंत, माध्यमिक शाळांनी RTGS /NEFT पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख- 29 मे पर्यंत राहणार आहे.

इ. 10 वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावीत. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रु मार्च 2026 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या व फेब्रु मार्च 2026 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै 2026, फेब्रु.-मार्च 2027 व जून-जुलै 2027 अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी. कौशल्य सेतू अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पध्दतीने आवेदनपत्र आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी.

सर्व माध्यमिक शाळांनी मंडळाच्या अधिकृत Website द्वारे प्राप्त Online चलनावर नमूद केलेल्या ICICI बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून NEFT/RTGS द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करावा. यापूर्वी वापरात असणाऱ्या Bank Of India/ HDFC Bank/Axis Bank च्या जुन्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये, त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. माध्यमिक शाळांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. तसेच नियमित विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही मंडळाने नमूद केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes