गतिमान शासनाकडून अपेक्षा : 710 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमोशन 17 वर्षापासून रखडले
schedule05 Jul 24 person by visibility 386 categoryआरोग्य
मुंबई : मागील 17 वर्षापासून राज्यातील 710 वैद्यकीय अधिकारी गट ब संवर्ग पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. याप्रकरणी राज्यपत्रीत वैद्यकीय अधिकारी महासंघाने शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला संघटनेच्या निरंतर लढ्यामुळे शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची यादी जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध केली मात्र सहा महिने होऊनही यादीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नाही पदोन्नतीची यादी तयार आहे तर पदोन्नती बाबत निर्णय घेण्यासाठी शासन दिरंगाई करत आहे. अशी भावना राज्यातील पदोन्नतीचे प्रतीक्षेतील गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. आगामी विधानसभेची निवडणूक बघता अतिशय गतिमान जनहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत मात्र 17 वर्षे पासून या दुर्लक्षित प्रश्नांवर निर्णय झालेला नाही. पण तातडीने हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
2019 मध्ये गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश झाला असताना त्यावेळी त्यांचा गट अ मध्ये समावेश होणे अपेक्षित होते. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यावेळी गट ब संवर्गात समायोजन करून शासनाला सहकार्य केले.
शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना ठराविक सेवेनंतर विभागीय पदोन्नती देण्यात येते. परंतु आरोग्य विभागातील गट ब वैद्यकीय अधिकारी संवर्गात कायम पदोन्नती पासून उपेक्षित राहिला आहे. पदव्युत्तर पदवीधारक गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांकरिता शासनाचे कुठेलेही निश्चितह धोरण नाही आयुर्वेदामध्ये एम, डी, एम, एस झालेल्या कित्येक अधिकाऱ्यांना गट ब पदावर कार्य करावे लागते ही गट ब वैद्यकीय अधिकारी संवर्गाची शोकांतिका आहे.
निरंतरपाठपुरावा करून सुद्धा राज्यातील गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक वर्षांपासून पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नाही. कित्येक अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र असूनही वंचित आहेत तर काहीजण सेवानिवृत्त झाले आहेत. यांना एकाच पदावर संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागत आहे पदोन्नती पात्र राज्यातील 710 वैद्यकीय अधिकारी गट ब हे मागील सतरा वर्षापासून एकाच पदावर कार्यरत आहेत. यातही कित्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गट ब पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेला आहे गट ब वैद्यकीय अधिकारी हे गट अ पदाचा अतिरिक्त कार्यभार संभाळू शकतात त्यांना त्यांच्या हक्काचे रिक्त जागी गट अ पदावर पदोन्नती देण्यास टाळाटाळ का असा संतप्त प्रश्न गट ब वैद्यकीय अधिकारी यांनी केला आहे.