+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule02 Jul 24 person by visibility 307 categoryगुन्हे
कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून राजारामपुरी येथील वालावलकर प्रशालेजवळ पंकज निवास भोसले (वय ३२, मूळ रा. कनाननगर, सध्या रा. राजारामपुरी) याचा दगडाने ठेचून चौघांनी खून केला. खुनाची घटना मंगळवारी दि. २ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली.

 हल्लेखोरांमध्ये तीन सख्ख्या भावांसह चौघांचा समावेश आहे. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून गणेश विक्रम काटे (वय ३०) आणि नीलेश विक्रम काटे (वय २७, दोघे रा. कनाननगर) या भावांना ताब्यात घेतले, तर उमेश विक्रम काटे आणि अमित गायकवाड (दोघे रा. कनाननगर) हे पसार झाले.

 कनाननगर येथील पंकज भोसले हा राजारामपुरीतील मनीष संबरगे यांच्याकडे कारचालक म्हणून काम करीत होता. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो कार घेऊन संबरगे यांच्या घरी पोहोचला. कार पार्क केल्यानंतर बाहेर रस्त्यावर थांबलेल्या चौघांनी पंकज याला बोलावून घेतले. काही अंतर बोलत गेल्यानंतर पाठीमागून एकाने पंकज याच्या डोक्यात काठी मारली. जीव वाचविण्यासाठी पंकज धावत सुटला. मात्र, कर्णिक पथ चौकात त्याला पाडून चौघांनी हल्ला केला. मारामारीचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे तातडीने घटनास्थळी पोहोचलेले त्यांनी गणेश काटे आणि नीलेश काटे या दोन हल्लेखोरांना पकडले. हल्लेखोर उमेश काटे आणि अमित गायकवाड हे दोघे दुचाकीवरून निघून गेले. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

गंभीर जखमी अवस्थेतील भोसले याला पोलिसांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.