+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule16 Oct 24 person by visibility 182 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : वाचनामुळेच माणूस अधिकाधिक प्रगल्भ बनतो, असे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित साहित्यकृतींचे अभिवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

डॉ. मोरे म्हणाले, आज मोबाईलच्या युगात वाचन कमी झाले असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी चांगले साहित्य वाचले पाहिजे, तरच आपण समृद्ध होऊ शकतो.

डॉ. रणधीर शिंदे म्हणाले की, वाचन ही आनंद देणारी गोष्ट आहे. आपण अनेक चांगल्या साहित्यकृतींचे वाचन केले पाहिजे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी काय वाचले पाहिजे, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

सदर साहित्यकृतींचे अभिवाचन कार्यक्रमांतर्गत मराठीतील निवडक साहित्यकृतींचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. त्यामध्ये योगिता ठोंबरे (नदीष्ट-मनोज बोरगावकर), प्रज्योती शिंदे (झाडवाटा-आनंद यादव), पृथ्वीराज पाटील (ढव्ह आणि लख्ख ऊन-राजन गवस), जय बाचनकर (डियर तुकोबा-विनायक होगाडे), संजना शेरखाने (एक पत्र भाईसाठी-सुनिता देशपांडे), प्रमोदिनी पुंगावकर (चानी-चिं.त्र्यं.खानोलकर), प्रांजली क्षिरसागर (माझ्या इंग्रजीची बोलू कौतूके-मंगला गोडबोले), हिना दळवी (पर्स हरवलेली बाई-मंगला गोडबोले), स्मिता राजमाने (संगीत देवबाभळी-प्राजक्त देशमुख), ज्योती चौरे (भुरा-शरद बाविस्कर), ऋणाली नांद्रेकर (आहे हे असं आहे-गौरी देशपांडे), करूणा उकीरडे (आता अमोद सुनासि आले-दि.बा.मोकाशी) या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिवाचनात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पारदे तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी एम.ए. भाग एक-दोन आणि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.