SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

मुंबई क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकरचा चतुर्थ क्रमांक

schedule22 Aug 25 person by visibility 423 categoryक्रीडा

कोल्हापूर  : मुंबई येथे झालेल्या मास्टर्स क्लासिकल रेटींग स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकर याने ६.५ गुण 8 फेरीत याने मिळवून खुल्यागटात १५,०००रु बक्षिसासह चौथा क्रमांक मिळवला. मुंबई येथे रशियन बुद्धिबळ केंद्र येथे या स्पर्धा 16 ते 21 ऑगस्ट दरम्यान पार पडल्या.

स्पर्धेत पहिल्या पटावर विक्रमादित्य कुलकर्णी विरुद्ध अरविंद अय्यर यांनी सामना बरोबरी करून अरविंद यांनी विजेतेपद मिळवले त्याला रोख 50,000 आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. ऋषिकेश कबनूरकरने तिसऱ्या बोर्डवर  ए एफ एम  साहिल चोगले याच्यावर विजय मिळवत साडेसहा गुण कमाई करत स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मिळवला रोख 15,000 रुपये आणि त्याला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत दोन्ही खेळाडूने प्रत्येक फेरीला एक तास 30 मिनिट अधिक 30 सेकंड अशी घड्याळ वेळ घेतली.

मास्टर्स क्लासिकल रेटींग  स्पर्धेत दोन आय एम, 73 आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित सह 142 खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेला एकूण 400000 रुपये पारितोषिक होती 

ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे  सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.  त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे,  कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes