SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरणजागतिक आर्थिक विकासाचा कणा: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगसमतेचा महामेरू, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कागलमध्ये अभिवादनगोकुळ वाचविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटील यांची साद शाहू महाराजांच्या विचारांवरच जयसिंगपूर शहराची वाटचाल : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरशाहू विचारांच्या जतनासाठी स्मारक नव्या रूपात नागरिकांना समर्पितकोल्हापूर जिल्ह्यासाठी आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद कक्ष (ERSU) स्थापन; विशेष वाहनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणशिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंती उत्साहात

जाहिरात

 

शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरण

schedule27 Jun 26 person by visibility 137 categoryसामाजिक

◼️कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे 35 वे वार्षिक अधिवेशन पेठवडगाव येथे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या समृद्ध शाहीरी परंपरेला उजाळा देणारे कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे 35 वे वार्षिक अधिवेशन रविवार, 28 जून रोजी दुपारी 3 वाजता पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मीनारायण हॉल येथे होणार आहे. तसेच या निमित्ताने शाहीरी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'शाहीर सरसेनापती' पुरस्कार यंदा शाहीर संजय जाधव (मिणचेकर) आणि शाहीर कृष्णात पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच अरुण शिंदे यांना उत्कृष्ट ढोलकीवादक, तर शा. बाळासो खांडेकर यांना उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष शाहीर शामराव खडके यांनी दिली.

शाहीर शामराव खडके म्हणाले, सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या 328 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शाहीरी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


या निमित्ताने राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट, पुणे आणि कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शाहीरी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शाहिरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मर्दानी खेळांच्या थरारक सादरीकरणाने होईल. त्यानंतर शाहिरांची पारंपरिक मशाल मिरवणूक, मान्यवरांच्या हस्ते सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या समाधीचे पूजन, समाधीस्थळी ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन आदी कार्यक्रम रंगणार आहेत. सकाळी 11.30 वाजता इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे व्याख्यान होणार असून, दुपारच्या सत्रात जिल्ह्यातील शाहिरांच्या दमदार पोवाड्यांनी शौर्य, इतिहास आणि संस्कृतीचा जागर घडविण्यात येणार आहे.

दुपारी 3 वाजता होणाऱ्या 35 व्या वार्षिक अधिवेशनात शाहीरी कला संवर्धन, नवोदित शाहिरांना प्रोत्साहन, तसेच लोककलेच्या जतनासाठी विविध विषयांवर चर्चा होणार आहे. कार्यक्रमास पेठ वडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव, नगराध्यक्षा विद्याताई पोळ, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे वंशज अमरसिंह जाधवराव, विविध मान्यवर, शाहीर, कलावंत आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळ्यास शाहीरी कलेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes