SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक सिंह दिन: जंगलाच्या राजाचे जतन आणि संवर्धनकोल्हापुरात १८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन; हद्दवाढीसह विविध प्रकल्पांना गतीविभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्यावत सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच मंजुरी देण्यात येईल : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारराज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिवसा मोफत वीज आणि थकबाकीमुक्त प्रमाणपत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससैनिक टाकळी एमआयडीसीवरून आंदोलक आणि आमदार यड्रावकर यांच्यातील चर्चा फिस्कटलीमास मीडियातून जनहिताला प्राधान्य द्या: प्रा. डॉ. ज्योती जाधवए.आय. ज्ञाननिर्मितीचे नव्हे; माहितीचे साधन: डॉ. ज्ञानेश्वर गटकरमहापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पणपद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य सामान्य माणसाला दिलासा देणारे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आगमन

जाहिरात

 

तरुणाईच्या प्रेमाचा, स्वाभिमानाचा आणि स्वॅगचा नवा आवाज - ‘रुबाब’ ६ फेब्रुवारीपासून प्रदर्शित!

schedule02 Feb 26 person by visibility 525 categoryमनोरंजन

कोल्हापूर  : मराठी सिनेसृष्टीत स्टायलिश मांडणी, आधुनिक विचार आणि तरुणाईच्या भावविश्वाशी थेट जोडणारी एक नवी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘रुबाब’. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आला. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही हटके टॅगलाईन घेऊन आलेला ‘रुबाब’ केवळ प्रेमकथा नसून, स्वतःची ओळख जपणाऱ्या, आत्मसन्मानाने जगणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या आजच्या पिढीची गोष्ट आहे. संभाजी ससाणे आणि शितल पाटील यांची फ्रेश जोडी, दमदार संवाद, स्वॅगदार सादरीकरण आणि भावनिक संघर्ष यामुळे ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

ट्रेलरप्रमाणेच चित्रपटाचे संगीतही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. पहिलं प्रेमगीत ‘कसं तरी होतंया रं’ मधून पहिल्या प्रेमातील हळवे, निरागस क्षण अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आले आहेत. जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजाला चिनार-महेश यांच्या सुरेल संगीताची साथ लाभली आहे. तर चित्रपटातील धमाकेदार ‘पॉम पॉम’ हे गाणं जल्लोष, पार्टी आणि उत्सवाचा नवा ठेका ठरणार आहे. नकाश अजीज आणि सोनाली सोनवणे यांच्या जोशपूर्ण गायकीतून हे गाणे प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये रंग भरणार आहे. नुकतच आलेलं रोमँटिक गाणं ‘मन जुळले’ प्रेमातील भावनिक जवळीक, विश्वास आणि नितळ नात्याचा स्पर्श अनुभवायला लावते. केतकी माटेगावकरच्या सुमधुर आवाजामुळे हे गाणं प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाचा आवाज ठरत आहे.

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “‘रुबाब’ हा आजच्या पिढीच्या प्रेमाचा ठाम आवाज आहे. प्रेमासाठी उभं राहणं, स्वतःच्या तत्त्वांवर जगणं आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करणं हाच या चित्रपटाचा आत्मा आहे.”

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “ आजचा प्रेक्षक स्वतःशी जोडणाऱ्या कथा पाहू इच्छितो. ‘रुबाब’ प्रेम, स्वप्नं आणि आत्मसन्मानाचा ठाम आवाज आहे. शेखर बापू रणखांबे यांच्या दिग्दर्शनातून ही रुबाबदार लव्हस्टोरी तरुणाईच्या भावविश्वाला प्रभावीपणे स्पर्श करेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘रुबाब’ हा चित्रपट तरुणाईच्या प्रेमाची, स्वाभिमानाची आणि स्वॅगची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes