+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule19 May 24 person by visibility 317 categoryक्रीडा
अतिग्रे : इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन मार्फत लखनऊ या ठिकाणी नुकत्याच झालेल्या अठरा वर्षाखालील मुलींच्या टेनिस स्पर्धेत ऐश्वर्या जाधवने सिंगल व डबल्स या दोन्ही खेळ प्रकारांमध्ये उपविजेतेपद पटकावले. 

 ऐश्वर्या जाधव संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. यापूर्वीही टेनिस खेळामध्ये तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सामने जिंकले आहेत. नुकत्याच लखनऊ या ठिकाणी झालेला सिंगल व डबल या दोन्ही खेळ प्रकारामधील अंतिम सामने अतिशय रंगतदार झाले. दोन्ही सामन्यात उपविजेतेपद प्राप्त करत ऐश्वर्याने भारत देशाचे व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले. विम्बल्डन खेळाडू, कोल्हापूरची कन्या ऐश्वर्या जाधव अशी ओळख निर्माण केलेल्या ऐश्वर्याचे टेनिस खेळावरील प्रभुत्त्व वाखाणण्याजोगे आहे. तिला अल्टवोल- अलेक्झांडर वास्के टेनिस अकॅडमी अहमदाबाद येथील प्रशिक्षक श्रीमल भट यांचे मार्गदर्शन लाभले. 

संजय घोडावत समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत , विश्वस्त विनायक भोसले, संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी या यशाबद्दल ऐश्वर्याचे कौतुक केले.