मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी केलेले सामंजस्य करार गुगलवर शोधतोय, काँग्रेस आमदार सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
schedule19 Jan 26 person by visibility 125 categoryराजकीय
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी सात सामंजस्य करार केल्याचं सांगितलं होतं तेच सामंजस करार मी आता गुगलवर शोधतोय असा टोला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरसाठी काही आणतील याबाबत शंका असल्याचेही आमदार सतेज पाटील यावेळी म्हणाले. जिल्हा काँग्रेस कमिटीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या मुलाखतीनंतर आमदार पाटील माध्यमांशी बोलत होते.
कोल्हापूरात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत कोल्हापूर महापालिकेला थोडक्यात महापौर पद हुकलं मात्र जिल्हा परिषदेला काँग्रेसला निश्चित बहुमत मिळेल, निवडणूक लागणार या दृष्टीने जिल्ह्यातून आठ दहा दिवस अगोदर आधीच जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी अर्ज मागवले होते. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात काँग्रेस, स्वाभीमानी शेतकरी संघटना , शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाशी शंभर टक्के आघाडी झाली आहे, फक्त उमेदवारी ठरवण्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, शिरोळ तालुक्यात स्वाभीमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे गटाची आघाडी झाली तर गडहिंग्लजमध्ये चर्चा अंतिम टप्प्यात आहेज्या ज्या तालुक्यात आघाडी करणं शक्य आहे तिथं आघाडी करून निवडणूकीला सामोरं जाणार असल्याचं जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले, वेगवेगळे लढले असते तर कोल्हापूरकरांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता महायुतीने वेगवेगळं लढायला हवं होतं तुमची एवढी ताकदं होती तर वेगवेगळं लढायला हवं होतं, भाजपचा विस्तार करायचा होता. 81 प्रभागात भाजपचं कमळ चिन्ह पोचवायचं प्रयत्न करायचा होता, राष्ट्रवादी - शिवसेननं देखील प्रयत्न करायचा होता, आमचे पाच उमेदवार 500 मताधिक्यने पराभूत झालेतं, कोल्हापूरात महायुतीचा तांत्रिक विजय आहे त्यांनी तो साजरा करावा लोकांचं मत आमच्या बाजूने होतं, कोल्हापूरात महायुतीला बहुमत मिळालं आहे त्यामुळे हिम्मत असेल तर अडीच - अडीच वर्ष महापौर करावा
आम्ही कधी म्हणलो नव्हतो महापौर पदाचे तुकडे करु, कोल्हापूरात अडीच वर्ष महापौर पद राहिलं पाहिजे महापौराला काम करण्याची संधी मिळावी, चांगला कारभार त्यांनी करावा असंही आमदार सतेज पाटील म्हणाले.
▪️35 उमेदवार निवडून देणाऱ्यांचा अपमान आहे....
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पस्तीस नगरसेवक निवडून आणले म्हणजे पराक्रम केला नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसनमुश्रीफ यांनी केलं होतं त्याला आज आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 35 उमेदवार बंटी पाटलांनी मिळवल्या नाहीत, जनतेनं दिल्या आहेत, उमेदवार निवडून देणाऱ्यांचा अपमान असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले. नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम आहे, डीपीआर करताना विचारपूर्वक केला जातो, चार चार वेळा अर्लायंमेंट बदलतायं म्हणजे त्या प्रोजेक्टची गरज नसल्याचे स्पष्टीकरण आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिलं.