+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule11 May 24 person by visibility 298 categoryक्रीडा
कोल्हापूर : फ्रान्स येथे होणाऱ्या १० ते १२ जून दरम्यान जागतिक आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापिठाचे ४ महिला खेळाडू आणि १ पुरुष खेळाडूची निवड करण्यात आली आहे. कल्याणी कृष्णाथ पाटील, वैष्णवी दत्तात्रय पाटील , साक्षी धनाजी कुंभार (सर्व न्यू कॉलेज, कोल्हापूर) आकांशा आनंद कातकडे आणि हार्दिक राजेभोसले (एल बी एस कॉलेज सातारा) या सर्वांची निवड भारतीय विठ्यापीठ रग्बी संघामध्ये केली आहे. 

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय विद्यापीठाच्या एका सांघिक क्रिडा प्रकारमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठाचे ४ खेळाडूंचा समावेश झाला आहे. हे खूप अभिनंदनीय आणि कौतुकास्पद बाब ठरली आहे. याचबरोबर शुभांगी बाळू गावडे आणि स्वाती जयाप्पा माळी यांचीही राखीव क्रं १ आणि २ वरती निवड करण्यात आली आहे. अखिलभारतीय आंतरविद्यापीठ आणि खेलो इंडिया या स्पर्धेमधे शिवाजी विद्यापीठाच्या महिला व पुरुष संघाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावून शिवाजी विद्यापीठाचे वर्चस्व अग्रक्रमांकावर कायम ठेवले आहे.

सर्व यशस्वी खेळाडूंना विद्यापीठाचे सम्माननीय कुलगुरू प्रा.डॉ.डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्र कुलगुरू ,प्रा.डॉ. पी एस पाटील , कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे , संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण प्रा.डॉ. शरद बनसोडे, डॉ पी. टी गायकवाड ,प्रशिक्षक श्री दिपक पाटिल , राहुल लहाने,  संग्रामसिंह मोर यांनी शुभेच्या दिल्या .जिल्हा संघटना अध्यक्ष अमर सासणे, अर्जुन पिटुक यांचे सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.