शिवाजी विद्यापीठ कबड्डी संघाची अखिल भारतीय स्पर्धेकरिता निवड
schedule05 Oct 25 person by visibility 163 categoryक्रीडा

कोल्हापूर: इंदोर (मध्य प्रदेश) येथे चालू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेमध्ये आज शिवाजी विद्यापीठाचा संघ डॉ. होमी भाभा विद्यापीठ मुंबई या संघावर विजय प्राप्त करून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला.
अत्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यामध्ये मध्यंतरापर्यंतचा स्कोर शिवाजी विद्यापीठ 14 व होमी भाभा विद्यापीठ 13 असा होता.
अंतिम पाच मिनिटांमध्ये सौरभ फगरे यांच्या चढाया व अवधूत आदित्य पवार यांनी केलेल्या पकडींच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाने हा सामना सहा गुणांनी जिंकला (32-28).
डॉ देवेंद्र बिरनाळे, डॉ संजय पाटील संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. प्राचार्य डॉ बाबासाहेब उलपे (अध्यक्ष) आणि अयुब कच्ची यांनी महत्वाची भूमिका बजावली.