एकाच वेळी सहा बाळांना जन्म; बालकांची, आईची तब्येत ठणठणीत
schedule21 Apr 24 person by visibility 718 categoryआरोग्य
इस्लामाबाद : पाकिस्तानात रावळपिंडीत एका महिलेने एकाच वेळी सहा बाळांना जन्म दिला आहे. हे 'सेक्स्टुपलेटस्' म्हणजेच 'षष्ठाळे' आणि त्यांची प्रसूतीनंतर बालकांची व आईची तब्येत ठणठणीत आहे.
हजारा कॉलनीत राहणाऱ्या मोहम्मद वहिद यांची 27 वर्षांच्या झीनत नावाच्या पत्नीने या बाळांना जन्म दिला. प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर गुरुवारी या महिलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी तिने तासाभरात एका पाठोपाठ एक अशा सहा बाळांना जन्म दिला. या सहा बाळांमध्ये चार मुलगे असून, दोन मुली आहेत. या सर्व सहा बाळांचे वजन दोन पौंडपेक्षा कमी आहे. याबाबतचे वृत्त पाकिस्तानच्या 'डॉन' या वृत्तपत्राने प्रसिद्धीस दिले आहे.
झीनतची ही पहिलीच प्रसूती होती. या पहिल्याच प्रसूतीवेळी तिने अशा सहा बाळांना जन्म दिला. प्रसूतीमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते हे लक्षात आल्यावर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम बनवण्यात आली होती.