+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule29 Jun 24 person by visibility 556 categoryउद्योग
कोल्‍हापूर : केंद्र शासनाने घेतलेला दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करावा यासाठी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी निवेदन दिले.  

 या निवेदनामध्ये म्हटले आहे कि, राज्यामध्ये हजारो टन दूध पावडर शिल्लक असताना केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून दहा हजार मे. टन दूध पावडर आयात करण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय दूध उत्पादक व दूध संघ यांचे कंबरडे मोडणारा आहे. अगोदरच दूध पावडरचे दर हे उत्पादन खर्च पेक्षा हि कमी झाले आहेत. त्यातच हा निर्णय झाल्याने दूध पावडरचे दर आणखी कमी होणार आहेत. राज्यात अतिरिक्त गाय दुधाचा प्रश्न निर्माण झाला असून गाय दुधाचे दर २७ रुपये पर्यंत खाली आले आहेत. दूध पावडरला अपेक्षित दर मिळत नसलेने दूध संघांना अतिरिक्त दुधापासून तयार होणाऱ्या दूध पावडरचा साठा करून ठेवावा लागत आहे. आज देशात जवळपास २ लाख मे. टन तर महाराष्ट्रात २० हजार मे.टन दूध पावडर शिल्लक आहे.   

  वरील वस्तुस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून दहा हजार मे.टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय हा दुग्ध व्यवसायाला मारक असून दूध दरावर थेट परिणाम करणारा आहे. सबब, सदरचा दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करणेबाबत खासदार शरद पवार यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे निवेदनात म्हटले आहे.