SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; कोल्हापूर पोलिसांच्या कामगिरीवर ५० हजारांचे बक्षीसकोल्हापूरचे किशोर घाटगे यांची 'ग्राहक संरक्षण समिती'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवडआंतरराष्ट्रीय खेळ दिन: बालपणाचा अविभाज्य आनंद आणि हक्ककोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमराज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयबिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाईॲपद्वारे खत खरेदीची सक्ती रद्द करावी; आमदार सतेज पाटील यांची मागणी..चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनजयसिंगपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरी

जाहिरात

 

बडोदा बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या कबनूरकर भावंडांचे यश

schedule25 Apr 26 person by visibility 460 categoryक्रीडा

गुजरात : बडोदा येथे २० ते २४ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या शक्ती चषक ध्रुवीक चेस अकादमी आयोजित आंतरराष्ट्रीय फिडे क्लासिक रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश आणि शर्वरी कबनूरकर यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ऋषिकेश कबनूरकर याने नवव्या फेरीत प्रतीक अबी याच्यावर विजय मिळवत एकूण ७ गुणांची कमाई केली. या कामगिरीमुळे त्याने १८०० रेटिंग पेक्षा कमी गटात प्रथम क्रमांक पटकावून १०,००० रुपये रोख आणि चषक आपल्या नावे केला. या स्पर्धेतून त्याने २५ फिडे मानांकन गुणांचीही कमाई केली आहे. एकूण ३६४ खेळाडूंनी सहभाग नोंदवलेल्या या स्पर्धेत गुजरातच्या अनाद कर्तव्याने ८.५ गुणांसह अजिंक्यपद मिळवले.

याच स्पर्धेत ऋषिकेशची बहीण शर्वरी कबनूरकर हिनेही महिला गटात चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. तिने कॅनडाच्या खेळाडूविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत साडेपाच गुणांची कमाई केली आणि ३४ फिडे मानांकन गुण मिळवले. तिला ३००० रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. शर्वरी ही केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी असून ऋषिकेश स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. 

हे दोन्ही खेळाडू दाभोळकर कॉर्नर येथील अनुज अकॅडमीमध्ये सराव करतात. त्याला शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे,  कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes