SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमराज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयबिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाईॲपद्वारे खत खरेदीची सक्ती रद्द करावी; आमदार सतेज पाटील यांची मागणी..चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनजयसिंगपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरीनाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजनराज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार शिरोली एमआयडीसीत अवैध्य गॅस विक्रीचा पर्दाफाश: ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रम

schedule10 Jun 26 person by visibility 93 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या महानगरपालिकेमधील कामकाजामध्ये होत असलेल्या अडीअडचणी जलदगतीने सोडविण्यासाठी "जनता दरबार" चे आयोजन केले आहे.

  त्यानुसार गुरुवार, दि.11 जून 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात जनता दरबार घेण्यात येणार आहे. यासाठी सकाळी 11 ते 12 या वेळेत नागरीकांनी आपले अर्ज सादर करावेत. या जनता दरबारामध्ये महापौर म्हणून रुपाराणी निकम नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेणार आहेत. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या तक्रारीबाबत कोर्टामध्ये दावे प्रलंबित आहेत अथवा सुरु आहेत असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

  तरी शहरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात संबंधित कागदपत्रांसह सादर करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes