स्वराज्य महिला चषक खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
schedule05 Oct 25 person by visibility 331 categoryक्रीडा

▪️श्रीराज भोसले,सुयोग काकणी,श्रीतेज वाली,वरद पाटील ओम साखरपे यांना विजेतेपद
कोल्हापूर : स्वराज्य महिला मंच कोल्हापूर यांचे वतीने प्रियदर्शनी स्पोटर्स फांऊडेशन ,कोल्हापूर आयोजित “ स्वराज्य महिला मंच चषक “ बुध्दिबळ स्पर्धेत श्रीराज भोसले, सुयोग काकणी, श्रीतेज वाली, वरद पाटील, ओम साथरपे यांनी विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळविली आहे, ही स्पर्धा सुर्यकांत मंगल कार्यालय,कळंबा येथे पार पाडली.
स्पर्धेचे उद्घघाटन खासदार धनंजय महाडिक, के दुर्गा सुनीता, आंचलिक प्रबंधक, बॅक ॲाफ महाराष्ट्र कोल्हापूर बाळ पाटणकर क्रीडा ट्रस्ट कोल्हापूर डॉ नेहा तेंडुलकर , अभय तेंडुलकर, पुष्पलता मंगल जागतिक चेस ॲालिम्पीयाड खेळाडू व श्री.शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती यांच्या हस्ते झाले.
के.दुर्गा,आंचलिक प्रबंधक ,बॅक ॲाफ महाराष्ट्र व बाळ पाटणकर अध्यक्ष क्रीडा ट्रस्ट कोल्हापूर यांनी केलेल्या खेळाचा विकास व सामाजिक कार्यासाठी खासदार धनंजय महाडीक यांचे हस्ते गौरव करणेत आला.
स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या. खुला गट, 7 वर्षाखालील, 9 वर्षाखालील, 11 वर्षांखालील तसेच 13 व वर्षाखालील उपविजेत्यांची नावे खालील प्रमाणे
स्पर्धेचे उपविजेतेपद खालीलप्रमाणे,
खुला गट – अनिकेत बापट
सात वर्षाखालील गटात – सौमित्र जोशी
नऊ वर्षाखालील गटात – ऋग्वेद हळबे
अकरा वर्षाखालील गटात – हर्षदा पाटील
तेरा वर्षाखालील गटात – सहर्ष टोकले
खुला गट विजेता श्रीराज भोसले रेंदाळ सात पैकी साडेसहा गुण याचा प्रथम क्रमांक आला याला 7000 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले द्वितीय क्रमांक साताऱ्याचा अनिकेत बापट व्दितीय क्रमांक 5000 रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले व्यंकटेश खाडे पाटील तृतीय 3000 आणि चषक देऊन गौरविण्यात आले चौथा क्रमांक मुदस्सर पटेलपाचवा क्रमांक अभिषेक पाटील मिरज ,आदित्य सावळकर शर्वरी कबनूरकर ,रवींद्र निकम ,प्रणव पाटील , सोहम खासबागदार प्रताप निंबाळकर अमर बागलकोट संतोष सारीकर प्रज्वल सुशांत शिंदे महिला गटात श्रावणी खाडे पाटील प्रथम अनुष्का पाटील द्वितीय
वरिष्ठ गटात कमल कृष्ण मंगल या 91 वयाच्या ज्येष्ठ खेळाडू होत्या सृष्टी पवार सिद्धांत पाटील यांना अंडर फिफ्टीन मध्ये बक्षीस देण्यात आले अंडर 13 मध्ये कोण साखरपे हा अजिंक्य ठरला त्याला 1000 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले द्वितीय क्रमांक सहर्ष तोकळे 500 रुपये पारितोषिक चषक तिसरा क्रमांक ओजस वनमाने 400 रुपये पारितोषिक आणि चषक
11 वयोगटात वरद पाटील हा चारा मध्ये चार गुण मिळून अजिंक्य पद मिळवले हजार रुपये आणि चषक, द्वितीब क्रमांक हर्षदा पाटील पाचशे रुपये व ट्रॉफ़ी ,आदित्य ठाकूर तृतीय क्रमांक चारशे रुपये व मेडल 9 खालील गटात हटाकर श्री तेज वाली हा अजिंक्य ठरला त्याला हजार रुपये आणि चषक तर उपयोजिता ऋग्वेद हळबे त्याला पाचशे रुपये व मेडल तर शिवतेज वाली मिरज चारशे रुपये व मेडल
सात वर्षाखालील गटात सुयोग काकणी अजिंक्य ठरला त्याला हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले. उपविजेता सौमित्र जोशी ह्याला पाचशे रूपये व मेडल जोहान शेख ह्याला चारशे रुपये व मेडल देऊन गौरवण्यात आले
उत्तेजनार्थ बक्षीस इवा कुंभार आणि रियांश गिरगावकर,शिवराज कामटे ह्यांना देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेमध्ये एकूण 160 स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धा होणेसाठी अभय तेंडूलकर. डॉ.नेहा तेंडूलकर , पुष्पलता मंगल ,बी.के.मंगल प्रदिप अष्टेकर यांनी अथक प्रयत्न केले आहे.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बाबासाहेब वाघमोडे, जिल्हाधिकारी मुद्रांक व शुल्क विभाग कोल्हापूर, अभय तेंडूलकर,पुष्पलता मंगल,प्रदिप अष्टेकर,श्वेता कुलकर्णी ,सुशांत गिरगावकर नायब तहसिलदार यांचे हस्ते करण्यात आला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील मुख्य पंच शैलेश होनकट्टी, सचिन भाट,बाबूराव पाटील, शंकर आदम कृष्णांत पाटील सौ प्रियंका ठोंबरे सम्मेद पाटील कपिल ठोंबरे, श्रुती देसाई यानी काम पाहिले
▪️बुद्धिबळातील एक प्रेरणादायी उदाहरण
कोल्हापूर मध्ये स्वराज महिला मंच आयोजित खुल्या बुद्धीबळ स्पर्धेमध्ये श्रीमती कमल कृष्ण मंगल यांचा सहभाग. वय वर्ष 90 असूनही त्यांनी स्पर्धेमधील सर्व फेऱ्या अतिशय जिद्दीने, आवडीने व न थकता पूर्ण केल्या. त्यांनी ही स्पर्धा 50 वर्षानंतर खेळली आहे. यापूर्वी त्यांनी मुंबईला स्टेट सिलेक्शन तसेच ओपन नॅशनल, सांगली तसेच बीड (मराठवाडा) येथील स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीस मिळवले आहेत.
▪️बुद्धिबळ स्पर्धेत अनुज् चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश
कळंबा येथे झालेल्या एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अनुज् चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळवले.
ओजस व्हनमाने इयत्ता 8 वी 13 वर्षांखालील वयोगटात तिसरा क्रमांक (शाळा: हॉलिडेन इंग्लिश मिडीयम स्कूल, कागल), शिवराज कामते इयत्ता UKG 7 वर्षांखालील वयोगटात तिसरा क्रमांक (शाळा: डी वाय पाटील विद्यानिकेतन), श्रीतेज वाली इयत्ता 3 री 9 वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक, शिवतेज वाली इयत्ता 3 री 9 वर्षांखालील वयोगटात तिसरा क्रमांक (शाळा: सौ शिलादेव डी शिंदे सरकार, हायस्कूल, तपोवन).
सर्वांना कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील प्रशिक्षक बाबूराव पाटील राष्ट्रीय खेळाडू तसेच बुद्धिबळ प्रशिक्षक अनुष्का पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.