SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : विजेचा शॉक देऊन 11 वर्षाच्या मुलाचा खून; पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यातमराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेडॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीरआषाढीवारीसाठी हलक्या व जड वाहनांना पथकरातून सुट मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पास घ्यावेतव्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसाय विस्तारा : मिथिलेश पांडे; सराफ संघाची कार्यशाळा उत्साहातडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषदजागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या बरोबरीने कलागुणांची जोपासना करणे गरजेचे : खासदार धनंजय महाडिकदूरशिक्षण केंद्राच्या एम.बी.ए.मधील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत निवडशिवाजी विद्यापीठात जमणार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्रज्ञांची मांदियाळी; तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेस उद्या प्रारंभकागल तालुक्यात गोबरगॅसच्या खड्डयात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

जाहिरात

 

व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसाय विस्तारा : मिथिलेश पांडे; सराफ संघाची कार्यशाळा उत्साहात

schedule18 Jun 25 person by visibility 170 categoryउद्योग

कोल्हापूर :  एमएसएमईच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसायाचा विस्तार करा, असे आवाहन जीजेईपीसीचे संचालक मिथिलेश पांडे यांनी केले.

कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व जीजेईपीसीच्या संयुक्त विद्यमाने येथील हॉटेल झोरबा येथे झालेल्या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमांची सुरवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सराफ संघाच्या पदाधिकारी व संचालकांच्या हस्ते झाला. नाहीद सुंके यांनीही मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या ३० जुलै ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मुंबई येथे आयआयजीएसतर्फे होणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्यावी.

 कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, दिवसेंदिवस व्यवसायातील परिस्थिती बदलत चालली आहे. व्यवसायाचे स्वरूपही बदलत आहे. अशावेळी अशा कार्यशाळांच्या माध्यमातून नवतंत्रज्ञानाने सभासदांना अवगत करण्याचा हा प्रयत्न आहेत त्याचबरोबर देशभर होणाऱ्या प्रदर्शनांना भेट दिल्यास बाजारात आज नवीन काय आहे, याचीही माहिती त्यांना मिळेल.  हॉलमार्क दागिन्याच्या बाबतीत आज ग्राहक अधिक सजग झाला आहे. त्यासाठी लवकरच संघाच्या वतीने हॉलमार्कसंबंधी कार्यशाळा आयोजित केली जाईल. त्यामध्ये व्यावसायिकांबरोबर शासनाच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल. त्यामुळे हॉलमार्क ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल.

मुंबईतील प्रदर्शनासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात सराफ व्यावसायिकांनी नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सचिव प्रीतम ओसवाल यांनी स्वागत केले. सचिव शिवाजी पाटील यांनी आभार मानले. यावेळी संचालक अशोककुमार ओसवाल, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, कुमार ओसवाल, कोल्हापूर जिल्हा सराफ उपाध्यक्ष दिनकर ससे, संचालक गजानन बिल्ले, संजय खद्रे, सतीश भोजे, दैवज्ञचे अध्यक्ष विजय घारे, मधुकर पेडणेकर, नंदू बेलवलकर, विकास जाधव यांच्यासह सराफ व सुवर्णकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes