SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घ्या : जिल्हाधिकारी अमोल येडगेहाजयात्रीचा पहिला जत्था उद्या कोल्हापुरात ......दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 23 जूनपासून सुरुडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा ४ दशकांचा प्रवास अभिमानास्पद : डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, ४१ वा वर्धापन दिन उत्साहातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपणडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा इटली येथे ‘इटालियन टेक्नॉलॉजी ऍवॉर्ड’ ने सन्मानठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशाराकोल्हापूर शहरातील हॉटेल व्यावसायिकांचा रोजचा कचरा उठाव करावा; कर्तृत्व संस्थेतर्फे प्रशासक के. मंजूलक्ष्मी याना निवेदनदूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा : मंत्री अतुल सावेमोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

जाहिरात

 

पन्हाळा तालुक्यातील तलाठी रमेश वळीवडेकर याला 25 हजारांची लाच घेताना पकडले रंगेहात

schedule26 May 25 person by visibility 418 categoryगुन्हे

कोल्हापूर  : पन्हाळा तालुक्यातील वाङी रत्नागिरी येथील तलाठी रमेश वळीवडेकर याला 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ पकडले.

 तक्रारदार याची गिरोली, ता. पन्हाळा येथे शेतात बोअरवेल मारायची होती. बोर मारण्याची गाडी जड असल्याने ती रूतु नये म्हणुन, शेतात जाणेकरीता शेतीच्या बाजुला गायरान रस्ता व्यवस्थीत नसल्याने, तात्पुरता रस्ता करण्याकरीता तक्रारदार यांचे परिचयाचे व्यक्तीचे जेसीबीने खडी पसरवत असताना, त्यावेळी तेथे तलाठी वळीवडेकर (सज्जा वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर रा. प्लॉट नंबर ५६ ब लघुवेतन कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)  हे आले, तक्रारदार यांना परवानगी न घेता काम का करता असे म्हणुन त्यांनी सदर ठिकाणचा पंचनामा करून जेसीबी ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी मला जेसीबी सोडवायचा असेल व पुढील कारवाई टाळायाची असेल तर ५०,०००/-रूपये दयावे लागतील असे म्हणून ५०,०००/- रूपयांची लाच मागणी केली त्यानंतर तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दिलेली होती.

अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी मध्ये तक्रारदार यांचे शेतामध्ये बोअरची गाडी जाणेसाठी जेसीबीच्या साहयाने गायरानात खडी पसरत असताना तलाठी वळीवडेकर यांनी तेथे येवुन पंचनामा करून जेसीबी जप्त केला होता. तो जेसीबी सोडविण्याकरीता व तक्रारदार यांचेवर पुढील कारवाई टाळणेकरीता तलाठी वळीवडेकर यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/-रू लाचेची मागणी करून तडजोडअंती २५०००/-रू लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

सदरबाबत तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक रमेश मुरलीधर वळीवडेकर, तलाठी सज्जा वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर यांचेविरूध्द दिले फिर्यादीवरून त्याचेविरूध्द कोडोली पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करणेचर प्रक्रिया चालु आहे.

ही कारवाई  शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे. श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.कोल्हापूर, यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक बापू सांळूके, सहा. फौ सुनिल मोरे, पो.हे. कॉ. सुनिल घोसाळकर, पो.ना. सुधिर पाटील, पोकों सदिप पवार चा. सहा. फौ गजानन कुराडे अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes