SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घ्या : जिल्हाधिकारी अमोल येडगेहाजयात्रीचा पहिला जत्था उद्या कोल्हापुरात ......दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 23 जूनपासून सुरुडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा ४ दशकांचा प्रवास अभिमानास्पद : डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, ४१ वा वर्धापन दिन उत्साहातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपणडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा इटली येथे ‘इटालियन टेक्नॉलॉजी ऍवॉर्ड’ ने सन्मानठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशाराकोल्हापूर शहरातील हॉटेल व्यावसायिकांचा रोजचा कचरा उठाव करावा; कर्तृत्व संस्थेतर्फे प्रशासक के. मंजूलक्ष्मी याना निवेदनदूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा : मंत्री अतुल सावेमोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपण

schedule19 Jun 25 person by visibility 250 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या प्रसंगी अकॅडमी डीन  प्रा. रवींद्र धोंगडी, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. सागर चव्हाण, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा. नितीन पाटील, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. रईसा मुल्ला, प्रा. शुभांगी महाडिक, डिग्री मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल थिकने, प्रा. सोहम तिवडे, गार्डन विभागाचे  तात्या देसाई व त्यांच्या टीमसह डिग्री इंजिनिअरिंग विभागाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गिरी  म्हणाले, “वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज असून केवळ झाडे लावणेच नव्हे तर त्यांचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ग्रीन कॅम्पस ठेवण्यावर नेहमीच भर दिला जातो. त्यामुळे पर्यावरण पूरक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि सामाजिक जाणीवा निर्माण केल्या जातात.”

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अजय कोंगे यांनी यशस्वीपणे पार पडले असून उपस्थित सर्वांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. वृक्षारोपण कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes