SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 46170 बालकांचे लसीकरणन्याय्य पदोन्नतीसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शिक्षकडॉ. जे. बी. शिंदे यांच्या दोन ग्रंथांचे प्रकाशनकर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चितडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवडपल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सेवा रुग्णालय येथे प्रारंभ नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान - सतीश मराठे" शालेय जीवनातील संस्कार व सदगुरूंचे मार्गदर्शन "विमा: सुरक्षित भविष्याचा भक्कम आधार!​३ लाख मतदार प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती; सतेज पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल!

जाहिरात

 

न्याय्य पदोन्नतीसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शिक्षक

schedule28 Jun 26 person by visibility 98 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : 'सर्व प्राथमिक शिक्षक संघटना' प्रणित 'महाराष्ट्र TET/CTET उत्तीर्ण झालेले व होणारे सीनियर शिक्षक कृती समिती'तर्फे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्या, २९ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत हे आंदोलन होणार असून, राज्यभरातील शिक्षक आपल्या न्याय्य हक्कासाठी एकत्र येणार आहेत.

या आंदोलनात शिक्षकांनी विविध मागण्या लावून धरल्या आहेत. यामध्ये १४ मे २०२६ रोजीचे संचालकांचे पत्र रद्द करणे, ४ जून २०२६ च्या शासन पत्रानुसार DPC दिनांक पात्र धरून सेवाज्येष्ठतेने पदोन्नती देणे, तसेच १४ मे च्या पत्रान्वये काही जिल्ह्यांत चुकीच्या पद्धतीने झालेल्या पदोन्नती रद्द करणे, या मुख्य मागण्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, इयत्ता १ ते ८ च्या अभ्यासक्रमावर स्वतंत्र TET परीक्षा घेण्याची मागणीही समितीने केली आहे. TET पेपर फुटीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे शिक्षकांची झालेली मानसिक ओढाताण लक्षात घेता, उत्तीर्ण गुणांची अट ४० टक्के करावी, अशी आग्रही मागणीही या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.


आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व सेवाज्येष्ठ शिक्षकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes