+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule21 Sep 23 person by visibility 576 categoryविदेश
नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने पिनिपेग शहरात भारतातून फरार असलेला गँगस्टर सुखदुल सिंग उर्फ ​​सुखा दुनुके याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या फेसबुक प्रोफाईलवरून एक पोस्ट करण्यात आली असून त्यात कॅनडातील हत्येची जबाबदारी घेण्यात आली आहे. यासोबतच इतर गुंडांनाही या पोस्टमध्ये धमकी देण्यात आली आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी अशा अनेक गंभीर गुन्ह्यात तो पंजाब पोलिसांना हवा होता.

पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, सुक्खा २०१७ मध्ये कनाडाला पळून गेला होता. तिथून तो खंडणीचं रॅकेट चालवत होता. दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांत एनआयएने मंगळवारी ४० हून अधिक कुख्यात गुंडांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात सुक्खाचाही समावेश होता. सुक्खा हा बांबिहा टोळीशी संबंधित होता. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीशी त्याचं वैर होतं, अशी माहितीही पोलिसांनी दिली. पंजाबच्या मालियान गावात २०२२ मध्ये कबड्डी सामन्यांदरम्यान कबड्डीपटू संदीप नगल अंबिया याची हत्या झाली होती. या हत्येत सुक्खा हा आरोपी होता. 

सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतली आहे. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून टोळीनं सुक्खाच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टमधून टोळीनं आणखी काही कुख्यात गुंडांना धमकी दिली आहे. कितीही पळा, तुमच्या पापाची शिक्षा मिळणारच, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.