+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule26 Jul 24 person by visibility 282 categoryराज्य
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणास्रोत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या होदिगिरी (जिल्हा दावणगिरी, कर्नाटक राज्य) येथील समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची आमदार सतेज पाटील यांनी भेट घेतली.

प्रसिद्ध लेखक, पानिपतकार विश्र्वास पाटील यांनी या समाधी स्थळाच्या दुरवस्थेबद्दल ट्विटरवर पोस्ट केली होती. त्या अनुषंगाने सर्व माहिती घेऊन आ. पाटील यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. समाधीस्थळाची देखभाल करणाऱ्या स्थानिक ट्रस्टच्या अध्यक्षांशीही या संदर्भात चर्चा करून समाधीस्थळाच्या देखभाली संदर्भात सर्वतोपरी मदत करण्याबाबत आश्र्वस्त केले होते.

आ. पाटील यांनी केलेल्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराच्या मागणीबाबत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. समाधीच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची उपलब्धता तातडीने करून देण्यासंदर्भात संबंधित विभागांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व महाराष्ट्राचे काँग्रेसचे पूर्व प्रभारी नामदार एच.के. पाटील जी यांनीही याबाबत सकारात्मकता दाखविली असून लवकरच याबाबत सकारात्मक कार्यवाही होईल अशी खात्री आ. पाटील यांनी व्यक्त केली.