SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ६ नोव्हेंबर रोजी पेंशन अदालतपन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभपुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा झेंडा! कौस्तुभ गावडे यांचा मोठा विजय; कोल्हापुरात गुलाल उधळत जल्लोषकोजागिरीच्या चांदण्यात रंगली 'कलासक्त'ची सुरमई मैफील; समाजभूषण किशोर घाटगे यांचा महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते सत्कारतेरवाड येथील आरोग्य शिबिरात २४६ नागरिकांची तपासणीपर्यावरणीय समतोल राखणे गरजेचे: उद्योजिका मोनिका मोहिते यांचे प्रतिपादन; किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ उद्घाटनदुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रिम मिळणारआंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन: कल्पकतेला आणि मनोरंजनाला सलामवारणा दूध संघामार्फत दीपावली 2026 निमित्त सभासदांना तूप भेट

जाहिरात

 

कोजागिरीच्या चांदण्यात रंगली 'कलासक्त'ची सुरमई मैफील; समाजभूषण किशोर घाटगे यांचा महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते सत्कार

schedule28 Oct 26 person by visibility 162 categoryसामाजिक

कोल्हापूर : "आजच्या धगधगीच्या आणि धावपळीच्या जीवनात संगीत हे केवळ मनोरंजनाचे किंवा विरंगुळ्याचे साधन राहिले नसून ती मानवी जीवनाची एक महत्त्वाची गरज बनली आहे. संगीतामुळे माणसाला नवचैतन्य मिळते," असे प्रतिपादन कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांनी केले.

कलासक्त परिवाराच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंकाळा पदपाथ उद्यान येथे 'चंद्र चांदण्याच्या स्वागताला सुरांचा साज' या विशेष संकल्पनेवर आधारित सुरमई संगीत गायनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात महापौर रूपाराणी निकम बोलत होत्या.

आंतरराष्ट्रीय शांतीदूत 'समाजरत्न' पुरस्कार मिळाल्याबद्दल  किशोर घाटगे यांचा महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. घाटगे यांच्या योगदानाचा गौरव करताना महापौर म्हणाल्या, " किशोर घाटगे यांनी गेली ३५ वर्षे सामाजिक, राजकीय आणि कलाक्षेत्रात केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. समाजातील विविध क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे."

रंकाळ्याच्या निसर्गरम्य परिसरात रंगलेल्या या सुरेल मैफिलीमध्ये मंत्रमुग्ध झालेल्या महापौर रूपाराणी निकम यांनाही गाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी कोजागिरीच्या रात्रीला आणि मैफिलीच्या वातावरणाला अनुसरून 'गली में आज चांद निकला' आणि 'फिजा भी है जवां जवां' ही लोकप्रिय गीते अत्यंत सुरेल आवाजात सादर केली. त्यांच्या गाण्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.


या कार्यक्रमात कलासक्त परिवाराच्या गायक कलाकारांनी आपली आवड जपत एकापेक्षा एक सरस आणि भावूक गीते सादर करून रसिकांना संगीताच्या दुनियेत न्हाऊ घातले. रंकाळा उद्यानाच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या सुरेल संगीताच्या कार्यक्रमाला कोल्हापूरकर संगीतप्रेमींनी अतिशय मोठ्या प्रमाणात आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या सोहळ्याला नगरसेविका माधुरी किरण नकाते, प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापती शीला सोनुले, कलासक्त परिवाराचे डी. एस. साळुंखे, नीलम काळे, अमित पाटील यांच्यासह अनेक गायक, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes