कोल्हापूर जिल्ह्यात महिलांच्या उत्फूर्त सहभागामुळे 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानाला गती
schedule03 Oct 25 person by visibility 232 categoryआरोग्य
▪️आज अखेर 1 लाख 94 हजार महिलांच्या आरोग्य तपासण्या
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वस्थ नारी, सशक्त परिवार राष्ट्रीय अभियान कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील 1 लाख 94 हजार 578 महिलांनी या अभियानात उत्साहाने सहभाग घेतला.
जिल्ह्यातील 81 आरोग्यवर्धिनी केंद्रे, नगरपालिका आरोग्य केंद्रे आणि 413 उपकेंद्रांमार्फत 4 हजार 299 शिबिरांमध्ये 1 लाख 94 हजार 578 महिलांनी सामान्य तपासणी, स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी - 1 लाख 3 हजार 708 तसेच 59 हजार 113 महिलांनी विशेष तज्ञांमार्फत तपासणी करुन घेतली. यापैकी 18 हजार 442 गरोदर मातांनी प्रसूतीपूर्व तपासणीचा लाभ घेतला. या अभियानात रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग, स्तन व गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग, सिकल सेल, रक्तक्षय यांसारख्या तपासण्यांसह लसीकरण, समुपदेशन, स्थानिक आहार प्रोत्साहन, मासिक पाळी स्वच्छता, टेक-होम राशन, माता व बालसुरक्षा कार्ड, आयुष्मान वंदना कार्ड, रक्तदान, अवयवदान नोंदणी आणि निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी असे विविध उपक्रम राबवण्यात आले. महिलांना मोफत तपासणी, उपचार आणि मार्गदर्शन मिळाले.
▪️स्वस्थ नारी अभियानाला जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-
▪️अभियानातील उपक्रम सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा
▪️रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी - 67 हजार 392, स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी - 1 लाख 3 हजार 708, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी- 18 हजार 442, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी - 5 हजार 666, क्षयरोग तपासणी - 17 हजार 103, सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी -42 हजार 173, विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन निरोगी जीवनशैली आणि पोषण - 1 लाख 63 हजार 296
▪️निरोगी जीवनशैली आणि पोषण
▪️स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे- 5 हजार 171, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार - 18 हजार 452, मासिक पाळी स्वच्छता व पोषण सल्ला - 31 हजार 748, टेक-होम राशन (THR) चे वितरण करण्यात आले.
▪️आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी माता व बालसुरक्षा (एमसीपी) कार्ड - 2 हजार 600, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी - 7 हजार 062, आयुष्मान वय वंदना कार्ड - 7 हजार 062, सिकल सेल कार्ड - 0, पोषण ट्रॅकर मध्ये लाभार्थी नोंदणीनागरिकांचा सक्रिय सहभाग
▪️नागरीकांचा सर्कीय सहभाग
रक्तदान शिबीर - 489, निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी - 810
▪️ या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व महिला व माता यांना तपासणीसाठी सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले होते. या अभियानामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपसंचालक आरोग्य डॉ.दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक, सर्व आरोग्य विभागामधील अधिकारी कर्मचारी तसेच खासगी संस्थाचे विषेश तज्ञ डॉक्टर व इतर पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यांने अभियान यशस्वी पार पडले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली.