SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

पट्टणकडोली येथे "भंडारा" चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न

schedule17 Jun 26 person by visibility 452 categoryमनोरंजन

◼️अध्यात्म, परंपरा आणि युवाशक्तीचा संगम घडवणारा चित्रपट "भंडारा" 
कोल्हापूर  : श्री विठ्ठल बिरदेव फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि अध्यात्म, संस्कृती तसेच युवा पिढीच्या विचारविश्वाला स्पर्श करणारा बहुचर्चित मराठी चित्रपट "भंडारा" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान, पट्टणकडोली (जि. कोल्हापूर) येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

श्री विठ्ठल बिरदेवांच्या पावन सान्निध्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचे दर्शन घडवले.
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश ननावरे, छायाचित्रकार अशोक महाजन, कार्यकारी निर्माता विनायक ढेरंगे, निर्मिती व्यवस्थापक नवीन भालेराव तसेच चित्रपटाचे मार्गदर्शक निलेश बाळू कोळेकर महाराज (निळोबा पुजारी, माणदेश) यांच्यासह देवस्थानाशी संबंधित मान्यवर आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

चित्रपटाविषयी दिग्दर्शक रमेश ननावरे यांनी सांगितले की, "भंडारा" हा केवळ मनोरंजनात्मक चित्रपट नसून युवा पिढीला आपल्या संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माशी जोडणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे.
आधुनिक जीवनाच्या धकाधकीत अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित करत समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल बिरदेव यांच्या कृपाशिर्वादाने आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे पार पडलेला हा टायटल लॉन्च सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. चित्रपटाच्या शीर्षक घोषणेनंतर उपस्थितांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली असून, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes